Delhi 10 Year Old boy Viral Video: दिल्लीच्या रस्त्यांवर रोल विकणाऱ्या एका १० वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी या मुलाचे कौतूक करीत आहेत. फूड व्लॉगर सरबजीत सिंग यांनी पश्चिम दिल्लीतील टिळक नगरमध्ये चिकन रोल बनवताना मुलाला पाहिल्यानंतर त्याचा व्हिडिओ शूट केला. यानंतर त्यांनी हा व्हिडिओ त्यांचे अधिकृत हँडल मिस्टर सिंगफूडहंटरवर पोस्ट केला.
व्हायरल व्हिडिओमध्ये सरबजीत सिंह यांनी संबंधित मुलाला त्याचा ठावठिकाणा विचारला. यानंतर या मुलाने आपले नाव जसप्रीत असल्याचे सांगितले. जसप्रीतने चेहऱ्यावर हसू आणत आपली हृदयद्रावक कहाणी सांगितली. मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीतच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी मेंदूच्या क्षयरोगाने निधन झाले. यानंतर जसप्रीतने त्याच्या वडिलांचा रस्त्याच्या कडेला असलेला स्टॉल चालवण्याचे काम हाती घेतले. त्याला एक मोठी बहीण आहे जी १४ वर्षांची आहे. जसप्रीतने सांगितले की, त्याची आई पंजाबला गेल्यानंतर तो आणि त्याची बहीण दिल्लीत काकांकडे राहत होते.
पुढे जसप्रीत म्हणाला की, तो त्याच्या वडिलांकडून रोल बनवायला शिकला. चिकन रोल, कबाब रोल, पनीर रोल, चाऊमीन रोल आणि सीक कबाब रोल असे विविध प्रकारचे रॅप जसप्रीतच्या स्टॉलवर उपलब्ध आहेत. व्लॉगरने त्याला विचारले की, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस आणि जिद्द कशी मिळते, तेव्हा त्या मुलाने पंजाबी भाषेत दिलखुलास उत्तर दिले.'मी गुरु गोविंदसिंग यांचा मुलगा आहे. जोवर माझ्यात ताकद आहे तोपर्यंत लढेन,' असे जसप्रीत म्हणाला.

|#+|
कर्नाटकातील दांडेली येथील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पतीसोबत झालेल्या वादातून एका महिलेने त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाला मगरींसमोर फेकले. या घटनेत निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दांडेली येथील एका महिलेचा काही कारणांवरून पतीसोबत वाद झाला. यानंतर ही महिला आपल्याच मुलाच्या जीवाची शत्रू झाली. महिलेने सहा वर्षाच्या मुलाला उचलले आणि घराच्या पाठीमागील नाल्यात फेकले. या नाल्यात अनेक मगरींचे वास्तव्य आहे, याची जाणून असतानाही महिलेने पोटच्या मुलाला मृत्युच्या हवाली केली. या जागेला क्रोकोडाइल पार्क असेही म्हणतात. दांडेली ग्रामीण पोलिसांनी मुलाचा अर्धा खाल्लेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मुलाच्या वडिलांचे नाव रवी कुमार आहे.दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.