पाश्चिमात्य संस्कृतीत कधी कधी खुल्या विचारसरणीच्या नादात विचित्र प्रसंग समोर येतात. गेल्या वर्षी एका महिलेने स्वत:शी लग्न केले होते, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले होते. आता तिने घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली आहे. होय, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि मॉडेल असणाऱ्या तरुणाने स्वत:शीच लग्न केले व वर्षानंतर घटस्फोटही घेतला. या तरुणीचे नाव सुलेन कॅरी असे आहे.
३६ वर्षीय सुलेन कॅरी हिचे इन्स्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हा विचित्र सोहळा साजरा करून त्याने इंटरनेट युजर्सचे लक्ष वेधून घेतले होते. ती मूळची ब्राझीलची असून सध्या ती लंडनमध्ये वास्तव्यास आहे.
रिपोर्टनुसार, सुलेन कॅरीने स्वत:चे लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिने कपल्स थेरपीही घेतली. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही व तिने घटस्फोटाची घोषणा केली. सुलेन म्हणाली, 'मी स्वत:शी लग्न केलं, पण तरीही एकटेपणा जाणवत होता. आता तिने स्वत:पासूनच विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तिने म्हटले की, मला माझ्या एकाकीपणाचा पश्चाताप नाही. आयुष्यात आत्मपरीक्षण आणि चिंतन महत्त्वाचे आहे, हे माझ्या लक्षात आले.
कोणतेही चक्र कधी संपवायचे हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. स्व-बांधिलकीमध्येही आव्हाने आहेत. आपण नेहमीच स्वतःसाठी योग्य असणे अपेक्षित आहे. सोलोगॅमीदरम्यान मला वाटले की मी स्वतःवर खूप दबाव आणत आहे. असे केल्याने खूप थकवा येतो. स्वत:शी लग्न करतानाही आपल्या त्रुटी मान्य करायला हव्यात, असेही ती म्हणते. स्वत:शी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. स्वत:ला फसवल्यास अडचणी वाढतील.
दक्षिण आफ्रिका खंडातील नामिबिया देशात इतका दुष्काळ पडला आहे की, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नामिबियात गेल्या १०० वर्षांत असा दुष्काळ कधीच पडला नव्हता. या देशात लोकांकडील अन्नधान्य संपले असून उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. सरकारी धान्य गोदामेही रिकामी झाली आहे. त्यामुळे हत्ती, झेब्रा, हिप्पोपोटॅमस सह ७०० जनावरे मारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने नामिबियाची निम्मी लोकसंख्या उपासमारीशी झुंजत असल्याचे म्हटले होते.