Viral Story: कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वेगवेगळ्या सवयी असतात. काही लोकांना त्यांच्या सवयी आवडतात तर, काहींना त्यामुळे त्रास होतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला पतीच्या सवयीमुळे इतकी कंटाळली आहे की, तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महिलेने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट केली आहे.
महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मम्सनेटवर एक पोस्ट लिहिली, ज्यात तिने म्हटले आहे की, तिच्या पतीला खूप वाईट सवय आहे की, तो कामावरून घरी येताच कपडे न बदलता बेडवर जाऊन झोपतो. या महिलेचा पती आचारी म्हणून काम करतो. त्यामुळे त्याच्या कपड्यांवर आणि अंगावर अन्न, तेल आणि मसाल्यांचे डाग लागतात, ज्यामुळे बेडशीट घाण होते. या महिलेने अनेकदा तिच्या पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे दोघांमधील वादाला तोंड फुटते, याचा परिणाम महिलेच्या वैवाहिक जीवनावरही होतो, असेही तिने म्हटले आहे.
पुढे महिलेने म्हटले आहे की, माझ्या पतीचे बालपण घाणीत गेले असे मला वाटते. पण आता मला या गोष्टींची सवय झाली आहे. कधी-कधी घटस्फोट घ्यावा, असा विचार माझ्या डोक्यात येतो. पण मला घटस्फोट घ्यायचा नाही. परंतु, अशा सवयींमुळे मला त्रास होतो आणि राग येतो.
या महिलेच्या पोस्टवर युजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने म्हटले आहे की, 'मी हे सहन करू शकणार नाही. त्यांनी स्वतःचा विचार केला पाहिजे की त्यांचे कपडे घाण असतील तर फ्रेश झाल्यावरच झोपायला हवे. जर काही सुधारणा होत नसेल तर त्याला सोडून देणे चांगले.' दुसऱ्याने म्हटले आहे की, 'तो अशा घाणेरड्या घरात राहत असेल तर तो जिथे स्वयंपाक करतो तिथे आणखी घाण पसरवत असेल.' आणखी एका युजरने आपल्या कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, ‘त्याला घाण का पसरवायची आहे?’
सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जी चक्क ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये डान्स करताना दिसते. तिचा डान्स पाहून मिटिंगमध्ये उपस्थित सर्वांनाच आश्चर्यचकित केले. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की इतर लोक देखील तिच्या डान्सचा खूप आनंद घेत आहेत. काही लोक तर त्या महिलेसोबत नाचायलाही तयार असल्यासारखे दिसत आहेत.