Viral Video : थायलंडमध्ये एक विचित्र आणि भयंकर घटना समोर आली आहे. ही घटना समुत प्राकण भागात घडली आहे. एक तरुण हा टॉयलेटमध्ये बसला होता. यावेळी टॉयलेटच्या आतुन तब्बल १२ फुटांचा अजगर निघाला असून त्याने टॉयलेटशिटवर बसलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगाला चावा घेतला. या तरुणाने या अजगराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या घटनेने स्थानिकांना धक्काच बसला नाही तर नेटकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तरुणाने या बाबत फेसबकूक पोस्ट केली असून अजगराचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. ठानट थांगटेवानन असे अजगराच्या हल्लीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण टॉयलेटमध्ये गेला होता. तो टॉयलेट सीटवर बसताच एका अजगराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या १२ फूट लांबीच्या अजगराने तरुणाच्या गुप्तांगाला चावा घेतला. अचानक अजगर चावल्याने तरुण ओरडून उभा राहिला. यावेळी त्याला जे दिसलं ते धक्कादाक होतं. त्याच्या टॉयलेट सीटच्या आत एक मोठा अजगर असल्याचं थानाटच्या लक्षात आलं.
या परिस्थितीतही ठाणट यांनी संयम व धैर्य दाखवलं. त्याने लगेच अजगराचे तोंड पकडून कमोडबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजगराने त्याच्या हातावर अनेक ठिकाणी चावा घेतल्याचे त्याने पोलिस ठाण्यात सांगितलं. त्यानं अजगराला मारल्याचं देखील सांगीतलं.
थाटणला अजगराने अनेक ठिकाणी चावा घेतला होता. मात्र, अजगर बिनविषारी असल्याने थानाला फारसा त्रास झाला नाही. या घटनेनंतर थाटनने रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करून आवश्यक इंजेक्शन्स घेतली. यानंतर तो घरी परतला. सध्या तो ठीक आहे. त्याने या घटनेचा व्हिडिओ देखील काढला असून त्याने तो पोलिसांना आणि सोशल मिडियावर देखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने विस्तृत माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये, टॉयलेट शिटवर रक्त दिसत आहे. तर थाटणने अजगराचे तोंड घट्ट पकडलेलं दिसत आहे.