Viral News : ‘पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो हो जाओगे खराब’! लहानपणीची ही म्हण तुम्ही तुमच्या मोठ्या व्यक्तिंकडून बरेचदा ऐकली असेल. जर अभ्यास केला तर तुम्ही मोठे व्हाल असा या म्हणीचा अर्थ आहे. मात्र, आता ही म्हण चुकीची ठरण्याची वेळ आली आहे. कारण, सोशल मीडियावर एका जॉबची जाहिरात व्हायरल झाली आहे. यात काम करण्यासाठी कोणत्याही प्रकरची पदवी, जुना अनुभव अशी कोणतीही माहिती मागितली नाही तर, अर्जदार हा एका ब्रेकअपमधून भेर पडलेला असावा अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे नेमकं काय प्रकरण आहे, याची माहिती घेऊयात.
निमिषा चंदा नावाच्या एका एक्स युजरने ही पोस्ट केली आहे. तिला एक ब्रेकअप झालेला प्रियकर हवा आहे. प्रोफाईलनुसार, निमिषा ही टॉपमेटमध्ये मार्केटिंग लीड आहे. तिनं केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, कंपनी अशा व्यक्तीच्या शोधात आहे, ज्याला डेटिंग संस्कृती पूर्णपणे माहित आहे. तो समोरच्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने डेट करू शकतो किंवा त्या प्रकारचे कौशल्य त्या व्यक्तीत असावे असे पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे. त्यामुळे हे काम अशा प्रेमीयुगलांसाठी आहे, ज्यांना डेटिंगच्या दुनियेची चांगली माहिती आहे.
निमिषाने एक्सवर पोस्ट करत लिहिलं अही की, जॉबसाठी सूचना. आम्ही चीफ डेटिंग ऑफिसरच्या शोधात आहोत, डेटिंगच्या सल्ल्यासाठी तुमचे मित्र सर्वप्रथम तुमच्या कडे येतात का? आम्ही डेटिंग संस्कृतीत राहणाऱ्या व ही संस्कृती जगणाऱ्या व्यक्तीला कामावर घेणार आहोत. 'घोस्टिंग', 'ब्रेडक्रम्बिंग' आणि डेटिंगशी निगडित नवे बझवर्ड शोधून काढू शकणारी स्वयंघोषित जोडी? हे कौशल्य असेल तर आम्ही तुमची निवड नक्की करणार आहोत. '
निमिषाने लिहिलेल्या पोस्टमध्ये जॉब साठी ३ अटी देखील ठेवल्या आहेत. या जॉब साठी कमीत कमी १ ब्रेकअप झाले असावे, दुसरी अट आहे डेंटिंग बाबत, अप्लाय करणाऱ्याला ३ डेटचा अनुभव असावा. पोस्टनुसार, कंपनी यासाठी तुम्हाला पुराव्याऐवजी ब्रेकअप आणि डेटिंगच्या गोष्टी सांगण्यास सांगेल. दुसरं म्हणजे, 'डेटिंगशी संबंधित अटी माहित असायला हव्यात आणि नव्या व्यक्तीला डेट करण्याचं धाडस असायला हवं.' तसेच जॉबसाठी अप्लाय करणाऱ्याव्यक्तीला किमान 'किमान २-३ डेटिंग अ ॅप्स वापरता यावे. (आम्हाला प्रत्यक्ष अनुभव असलेला व्यक्ति हवा आहे, कॅटफिशिंगला परवानगी नाही!)
जर तुम्हाला वाटते की तुमच्याकडे ही कौशल्य आहेत तर तुम्ही अर्ज करू शकता. तुमचा अर्ज https://lnkd.in/gzvGewnb या लिंकवर पाठवा.
सर्वोत्तम व्यक्तीला टॉपमेट कंपनीकडून खजूर देखील मिळतील. त्यामुळे त्वरा करा व अप्लाय करा असे पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कंपनीच्या या जाहिरातीवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, "काश मी येथेही अर्ज करू शकेन." काम करायला किती मस्त जागा आहे. त्याचवेळी एका युजरने 'चीफ डेटिंग ऑफिसर असावा असं नातेवाईकांना काय सांगाल', असा प्रश्न विचारला आहे.
संबंधित बातम्या