हिला आई कसं म्हणावं? पोटच्या दोन मुलांना ओव्हनमध्ये टाकून जाळून ठार मारलं!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हिला आई कसं म्हणावं? पोटच्या दोन मुलांना ओव्हनमध्ये टाकून जाळून ठार मारलं!

हिला आई कसं म्हणावं? पोटच्या दोन मुलांना ओव्हनमध्ये टाकून जाळून ठार मारलं!

Nov 18, 2024 04:05 PM IST

Viral news : एका अमेरिकन महिलेने आपल्या मुलांना ओव्हनमध्ये टाकून जाळून ठार मारले. खुनाची ही क्रूर पद्धत पाहून न्यायालयानं तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हिला आई कसं म्हणावं? पोटच्या दोन मुलांना ओव्हनमध्ये टाकून जाळून ठार मारलं!
हिला आई कसं म्हणावं? पोटच्या दोन मुलांना ओव्हनमध्ये टाकून जाळून ठार मारलं!

viral news : अमेरिकेच्या अटलांटा राज्यातील तीन मुलांच्या आईने आपल्या दोन मुलांना ओव्हनमध्ये टाकून क्रूरतेने तिची हत्या केली. या हत्ये प्रकरणी न्यायालयाने तिला  जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २४ वर्षीय लॅमोरा विल्यम्सने तिच्या १ वर्षीय जॅकरटर पेन आणि २  वर्षीय यौंटे पेन यांना ओव्हनमध्ये टाकून त्यांची  निर्घृण हत्या केली.  दोन्ही मुलांच्या हत्येसह विल्यम्सला १४ आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आणखी अतिरिक्त ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील देण्यात आली आहे.  विशेष म्हणजे ही घटना २०१७ मध्ये घडली होती. महिलेने स्वत: इमर्जन्सी नंबरवर फोन करून घरात दोन मुले मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

मात्र, पोलिसांच्या तपासात ही महिला दोषी असल्याचं आढळलं आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणी कोर्टात खटला सुरू होता. न्यायालयाला देखील ही महिला दोषी असल्याचं आढळलं असून तिला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 

या महिलेने पोलिसांची दिशाभूल करत सांगितले होते की, "जेव्हा मी घरात आले,  तेव्हा माझ्या धाकट्या मुलाचे डोके माझ्या मुलाच्या वर पडले होते आणि माझा दुसरा मुलगा जमिनीवर पडला होता. दरम्यान, तिने  आपत्कालीन फोन क्रमांक डायल करत याची माहिती पोलिसांना दिली. तसेच मुलांच्या मृत्यूप्रकरणी माझा दोष नसल्याचं देखील महिलेने कोर्टात सांगितलं.  मी नुकतेच घरी परतले होते. त्याच वेळी मुलांचे वडील जमील पेन यांनीही ९११ वर फोन करून या घटनेची माहिती दिली.  पत्नीने त्यांना व्हिडिओ कॉल करून या घटनेची माहिती दिल्याचे त्यांनी  सांगितले.

पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना मुलांचे मृतदेह जमिनीवर आढळले आणि दोघांवरही जळालेल्या खुणा दिसल्या.  वैद्यकीय परीक्षकाने प्राथमिक तपास करत त्यांची जाळून हत्या करण्यात आल्याचं सांगितले.  दोघांचेही डोके ओव्हनमध्ये ठेवले गेले असावे अशी शंका देखील वर्तवण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात दोन्ही मुलांचा ओव्हनमध्ये टाकून जाळून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.  

अटलांटा पोलीस विभागाने जारी केलेल्या अटक वॉरंटनुसार, १२  ऑक्टोबर २०१७ च्या मध्यरात्री विल्यम्सने जाणूनबुजून आपल्या दोन लहान मुलांना ओव्हनमध्ये ठेवले आणि ओव्हन  चालू करत त्यांची जाळून हत्या केली. दरम्यान, विल्यम्सने आपण या प्रकरणी दोषी नसल्याचं म्हटलं आहे.   विल्यम्सची आई ब्रेंडा म्हणाली की, तिची मुलगी मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहे. त्यामुळे ती  तुरुंगात असताना तिच्या जीवाचे बरेवाईट करू शकते. यामुळे तिच्यावर नजर ठेवावी अशी मागणी तिच्या आईने पोलिसांना केली आहे. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर