मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : धक्कादायक! उसाच्या रसात थुंकून ग्राहकांना देणाऱ्यांना नागरिकांनी शिकवला धडा; दोघांना अटक

Viral News : धक्कादायक! उसाच्या रसात थुंकून ग्राहकांना देणाऱ्यांना नागरिकांनी शिकवला धडा; दोघांना अटक

Jun 17, 2024 07:58 AM IST

Delhi Viral News : नोएडा सेक्टर १२१ मध्ये उसाच्या रसात थुंकून लोकांना देण्याऱ्या दुकानदाराला ग्राहकांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

धक्कादायक! उसाच्या रसात थुंकून ग्राहकांना देणाऱ्यांना नागरिकांनी शिकवला धडा; दोघांना अटक
धक्कादायक! उसाच्या रसात थुंकून ग्राहकांना देणाऱ्यांना नागरिकांनी शिकवला धडा; दोघांना अटक

Delhi Viral News : देशात मॉन्सून दाखल झाला असला तरी अनेक ठिकाणी अद्याप पाऊस झालेला नाही. यामुळे तापमान देखील वाढले आहे. राजधानी दिल्ली येथे प्रचंड उकड्याने नागरिक हैराण झाले आहे. यामुळे अनेक जण शीतपेय पिण्यास प्राधान्य देतात त्यात उसाचा रस हा सर्वांचा आवडीचा असतो. मात्र, ग्रेटर नोएडा सेक्टर १२१ मध्ये असलेल्या क्लियो काउंटी सोसायटीजवळ उसाच्या रसात थुंकून लोकांना दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या दुकानदाराला नागरिकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. या घटनेचा व्हिडिओ पूढे आला होता. त्यानंतर तो व्हाररल झाल्यावर नागरिकांनी त्याची तक्रार पोलिसांत केली. या तक्रारीनंतर दुकानदाराला व दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या बाबत क्षितिज भाटियाने पोलिसांना सांगितले की, ते सेक्टर-१२१ येथील गढी चौखंडी गावाजवळ असलेल्या क्लियो काउंटी सोसायटीत राहतात. शनिवारी सायंकाळी ते पत्नीसह सोसायटीच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर असलेल्या उसाच्या रसाच्या दुकानात गेले होते. तिथे त्याने दोन ग्लास उसाचा रस मागवला. असा त्यांचा आरोप आहे. ज्यूस विक्रेत्याने ज्यूस ग्लासमध्ये तीन ते चार वेळा थुंकून ज्यूस दिला. ही बाब त्यांच्या लक्षात आली. या घटनेला त्यांनी विरोध केला. मात्र, आरोपीने त्यांच्यातील गैरवर्तन केले. दरम्यान, त्याने हुज्जतबाजी केली असतात व स्थानिकांनी विरोध केला असता, आरोपींनी ज्यूसचा स्टॉल सोडून पळ काढला.

या नंतर या प्रकाराची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. एडीसीपी सेंट्रल नोएडा हृदेश कथेरिया यांनी रविवारी सांगितले की, नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तसेच थुंकीत मिसळलेला रस विकल्याबद्दल दोघांना अटक करण्यात आली आहे. शाहेब आलम आणि जमशेद खान अशी या दोन्ही आरोपींची नावे असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील आहेत.

भाषा रिपोर्टनुसार, पोलिस प्रवक्त्याने सांगितले की रविवारी सकाळी स्थानिक फेज ३ पोलिस स्टेशनमध्ये एफईआर नोंदवण्यात आला आणि नंतर दोन्ही आरोपी - जमशेद (वय ३०) आणि सोनू उर्फ ​​साहबे आलम यांना पोलिस कोठडीत घेण्यात आले. आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १५२ A (१) (बी) (सार्वजनिक शांतता बिघडवणे), २७० (जीवासाठी धोकादायक रोगाचा संसर्ग पसरवणारी घातक कृत्ये) आणि ३४ (जखमी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींवर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

WhatsApp channel
विभाग