Viral News : स्पर्धेच्या या युगात अनेक कंपन्या आपल्या कुशल आणि चांगल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत टिकून ठेवण्यासाठी विविध ऑफर्स व बोनस जाहीर करत असतात. अनेक कंपन्या बोनसमध्ये घरे, कार आणि भेटवस्तू देतात, तर काही कर्मचाऱ्यांना रोख रक्कम देतात. अशीच एक ऑफर सध्या चर्चेत असून तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ही कंपनी चीनची आहे. चीनमधील एका क्रेन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना रोख रक्कम गोळा करण्याची ऑफर दिली. याअंतर्गत कंपनीने ११ मिलियन डॉलर्सच्या (७० कोटी रुपये) नोटा टेबलवर ठेवल्या आणि आपल्या कर्मचाऱ्यांना जेवढी रक्कम मोजता येईल तेवढी उचलण्यास सांगितले. ही रक्कम तुमच्या वर्षभराचा बोनस असेल, पण त्यासाठी कर्मचाऱ्यांना फक्त १५ मिनिटे देण्यात आली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेनान मायनिंग क्रेन कंपनी लिमिटेडने आपल्या कर्मचाऱ्यांना ही भन्नाट ऑफर दिली होती. ३६५ दिवसांचा बोनस १५ मिनिटांत मोजून त्यांना मिळवता येणार, असे कंपनीने म्हटले आहे. चिनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानंतर इन्स्टाग्राम आणि एक्सवर देखील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे की, एका मोठ्या टेबलवर भरपूर नोटा ठेवण्यात आल्या आहेत. व कंपनीचे कर्मचारी या टेबला भोवती आहेत. ते जास्तीत जास्त पैसे मोजताना दिसत आहेत. ८ डेनुसार, एका व्यक्तीने १५ मिनिटांत १०० हजार युआन म्हणजेच १२.७ लाख रुपयांची रोकड मोजण्यात यश मिळवले. इतर कर्मचाऱ्यांनी देखील मोठी रोख रक्कम गोळा करून लवकरात लवकर मोजली व आपला वर्षभराचा बोनस मिळवला. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओवर कॅप्शनही होते, "हेनान कंपनी आपल्या वर्षअखेरच्या बोनससाठी लाखो रुपये देत आहे." कर्मचारी जेवढी रक्कम मोजतील तेवढी रक्कम त्यांना बोनस स्वरूपात मिळेल.
या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. काहींनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी जोक्स शेअर केले आहेत. एका व्यक्तीने लिहिलं, "अगदी माझ्या कंपनीसारखं." पण पैशांऐवजी ते भरपूर काम देतात. आणखी एक जण म्हणाला, " हे पैसे मला हवे आहेत. पण कंपनीने ही योजना दिली नाही." काहींंनी तर या संकल्पनेवर टीकाही केली आहे. तर काहींनी कंपनीच्या उदारतेचे कौतुक केले, तर काहींनी या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एका युजरने लिहिले की, "हे खरोखरच प्रेरणादायी आणि विलक्षण आहे. आणखी एक जण म्हणाला, 'या सर्कसच्या कामाऐवजी तुम्ही थेट कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा करू शकला असता. हे संतापजनक आहे. तथापि, हेनान मायनिंग क्रेन कंपनी आपल्या मोठ्या बोनसमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक जेवणादरम्यान मोठी रोख रक्कम वितरित केली होती. "
संबंधित बातम्या