नर्सरी एडमिशनची फी पाहून नेटकरी चक्रावले; म्हणाले, पार्किंगचे तरी पैसे कशाला सोडता?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नर्सरी एडमिशनची फी पाहून नेटकरी चक्रावले; म्हणाले, पार्किंगचे तरी पैसे कशाला सोडता?

नर्सरी एडमिशनची फी पाहून नेटकरी चक्रावले; म्हणाले, पार्किंगचे तरी पैसे कशाला सोडता?

Updated Oct 24, 2024 04:46 PM IST

Viral News: नर्सरी एडमिशनच्या फीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नर्सरी एडमिशनची फी पाहून नेटकरी चक्रावले
नर्सरी एडमिशनची फी पाहून नेटकरी चक्रावले

nursery Fee Viral News: वाढत्या महागाईसह मुलांच्या शिक्षणाचाही खर्च वाढल्याने पालक चिंतेत आहेत. यातच नर्सरीच्या प्रवेशासाठी अवाजवी फी रचना उघडकीस आणणाऱ्या एका फोटोमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नर्सरी आणि ज्युनियर केजीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून ५५ हजार रुपये घेतले जात आहे, ज्यात पालकांच्या ओरिएंटेशनसाठी त्यांच्याकडून एकावेळी ८ हजार ४०० रुपये शुल्क आकारले जाते. याबाबत एका ईएनटी सर्जनने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.

ईएनटी डॉक्टर जगदीश चतुर्वेदी यांनी ट्विटरवर केलेल्या एका पोस्टमध्ये नर्सरच्या मुलांकडून आकरण्यात येणाऱ्या फीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, 'पालकांच्या ओरिएंटेशनसाठी ८ हजार ४०० रुपये खर्च, कोणताही पालक डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी यापैकी २० टक्के रक्कमही देण्यास तयार होणार नाही. मी आता शाळा उघडण्याचा विचार करत आहे.' जगदीश चतुर्वेदी यांच्या ट्विटरमधील बायोनुसार, ते सर्जन असण्याबरोबरच स्टँडअप कॉमेडियन आणि उद्योजक देखील आहेत.

दरम्यान, २२ ऑक्टोबर २०२४ रोजी ही पोस्ट करण्यात आली, आतापर्यंत या पोस्टला हजारो लोकांनी लाइक केले आहे. तर,  बऱ्याच लोकांनी पुन्हा शेअर केली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

अवाजावी फी रचनेमुळे लोक चिडले आहेत. अनेकांनी शिक्षण हा व्यवसाय बनल्याचा दावा केला. या पोस्टच्या कमेंटमध्ये एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'आपल्याला शिक्षण व्यवस्थेत क्रांतीची गरज आहे. काही स्टार्टअप्स परवडणाऱ्या किंमतीत चांगल्या दर्जाच्या शिक्षण देणारी शाळा सुरू करू शकतात का?' दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'शिक्षण आता व्यवसाय बनला आहे.' तिसऱ्या व्यक्तीने थेट पालकांकडे बोट दाखवले आहे. त्याने म्हटले आहे की,'लोक पैसे द्यायला तयार आहेत म्हणूनच त्यांनी फी वाढवली आहे. लोकांनी अशा शाळेत टाकणे बंद करा, ते आपोआप फी कमी करतील.' चौथ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'लोक आपल्या मुलांसाठी ते खर्च करतील, जे ते स्वतःसाठी कधीच करणार नाहीत. त्यामुळेच महागडे कोचिंग सेंटर, शाळा, महाविद्यालयाच्या संख्येत वाढ झाली आहे.' आणखी एक युजर म्हणतोय की, 'आता मला समजले आहे की माझ्या वडिलांनी मला सरकारी शाळेत का पाठवले?'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर