Viral news : पलंगावर झोपलेल्या महिलेच्या केसात घुसला साप! पुढे जे काही घडलं ते भयंकर; पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : पलंगावर झोपलेल्या महिलेच्या केसात घुसला साप! पुढे जे काही घडलं ते भयंकर; पाहा व्हिडिओ

Viral news : पलंगावर झोपलेल्या महिलेच्या केसात घुसला साप! पुढे जे काही घडलं ते भयंकर; पाहा व्हिडिओ

Published Jul 30, 2024 01:00 PM IST

Viral news : पलंगावर बिनधास्त झोपलेल्या एका महिलेच्या केसात साप घुसला व सरपटू लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

पलंगावर झोपलेल्या महिलेच्या केसात घुसला साप! पुढे जे काही घडलं ते भयंकर; पाहा व्हिडिओ
पलंगावर झोपलेल्या महिलेच्या केसात घुसला साप! पुढे जे काही घडलं ते भयंकर; पाहा व्हिडिओ

Viral news : साप म्हटले की अनेकांची घाबरगुंडी उडते. सापाचे आणि मानवाचे वेगळेच नाते आहे. साप आपल्याला फक्त जंगलातच नाही तर मानवी वस्तीत देखील आढळतात. मात्र, पावसाळ्यात हे साप घरात देखील घुसतात. तुम्ही अनेक वेळा गाडीत, हेल्मेट, पाइप आदि ठिकाणी साप लपले असल्याच्या घटना किंवा विडिओ पहिले असेल. पण, चक्क अंगणात झोपलेल्या महिलेच्या केसात साप लपला यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. अंगणात झोपलेल्या एका महिलेच्या केसात चक्क साप घुसला असून या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्सही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये एक महिला झोपलेली दिसत असून तिच्या केसात साप गेल्याचे दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेला तिच्या डोक्यात साप गेला असल्याची पुसटशीही कल्पना नव्हती. ही महिला झोपेत होती. ही बाब तिच्या नतेवाइकांच्या लक्षात आली. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढला असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेन्ट देखील दिल्या आहेत. काहींनी म्हटले आहे की साप उबदार गोष्टींकडे आकर्षित होतात आणि हे शक्य आहे की सापाने महिलेच्या केसांना स्वतःसाठी उबदार आणि सुरक्षित स्थान मानले असावे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये साप महिलेच्या केसांमधील हेअरबँडमध्ये अडकलेला दिसत आहे. @kashikyatra या सोशल मिडीया यूझरने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीचे तब्बल २.१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर २ लाख २६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर १ लाख २८ हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहेत. पोस्टवर किमान २ हजर ०९ कमेन्ट आल्या आहेत. तसेच याची संख्या देखील वाढत आहे.

एका यूझरने या पोस्टवर "हर हर महादेव" अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने या सापाची ओळख बफ स्ट्रीप केलबॅक म्हणून केली आहे. त्याने म्हटले आहे की हा साप विषारी नसतो. तर दुसऱ्या एका युजरने या व्हिडिओवर त्याचा वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे. त्याच्यासोबतही हा प्रकार घडल्याचे त्याने लिहिल्या कमेन्टमध्ये सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर