Viral Video: तीन दरोडेखोरांशी एकटी भिडली महिला! धाडसानं केलं घराचं संरक्षण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल-viral news single woman overpowered 3 dacoits and saved the house her bravery was captured on camera ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: तीन दरोडेखोरांशी एकटी भिडली महिला! धाडसानं केलं घराचं संरक्षण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: तीन दरोडेखोरांशी एकटी भिडली महिला! धाडसानं केलं घराचं संरक्षण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Oct 06, 2024 07:09 AM IST

Viral Video: सोशल मिडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत एकटी महिला तीन दरोडेखोरांशी लढताना दिसत आहे.

तीन दरोडेखोरांशी एकटी भिडली महिला! धडसानं केलं घराचं संरक्षण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
तीन दरोडेखोरांशी एकटी भिडली महिला! धडसानं केलं घराचं संरक्षण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर एका महिलेच्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला न घाबरता विलक्षण धाडस आणि साहस दाखवत एकटीच तीन दरोडे खोरांशी लढतांना दिसतआहे. पंजाबमधील या महिलेच्या धाडसामुळे दरोड्याचा प्रयत्न हाणून पडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी या महिलेचे कौतुक करत आहेत. व्हिडिओत घरात घुसलेल्या तीन दरोडे खोरांशी एकटी महिला लढतांना दिसत आहे. तसेच त्यांना तिने पळवून देखील लावले.

एका पत्रकाराने एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करतांना त्याने या घटनेची माहिती देखील दिली आहे. हा व्हिडिओ अमृतसरमधील असून दरोडेखोरांनी एका घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु घरात असलेल्या धाडसी महिलेसमोर दरोडेखोर काहीही करू शकले नाहीत. या धाडसी महिलेने एकट्याने तिन्ही दरोडेखोरांवर मात केली.

सीसीटीव्ही फुटेजनुसार तिने तिन्ही दरोडेखोरांना पकडले. एक इंचही मागे न हटता प्रतिकार करत हुशारीने सोफ्यावरून महिलेने दरवाजा बंद केला. दरम्यान, यावेळी ती मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

एका युजरने लिहिले की, "आपल्या घराचे रक्षण केल्याबद्दल आणि धैर्याला सीमा नसते हे दाखवून दिल्याबद्दल ही महिला सन्मानास पात्र आहे. एकाने लिहिले की, "हे खूप धाडसी आहे कारण घरात दोन लहान मुले देखील आहेत. त्यामुळे महिलेला स्वत:चे रक्षण करण्यासाठी आणखी शक्ति मिळाली. आणखी एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात घराबाहेरचे दृश्य दिसत आहे. त्यात दरोडेखोर महिलेला मारण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत.

Whats_app_banner
विभाग