Viral Video : भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. या चटण्या विविध प्रांतानुसार प्रसिद्ध आहेत. भारतात आढळणाऱ्या चटण्यांच्या प्रकारांमध्ये लाल मुंग्यांची चटणी सर्वात फेमस झाली आहे. या चटणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ही चटणी तयार करण्याची पद्धत देखील अनोखी आहे. ही चटणी ओडिशा, छत्तीसगड आणि आसपासच्या भागात तयार केली जाते. नुकताच ही चटणी तयार करतांनाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अडीच कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. foodguyrishi या ब्लॉगरने शेअर केलेल्या रीलमध्ये तुम्ही लाल मुंग्यांची चटणी स्टेप बाय स्टेप तयार करताना पाहू शकाल. व्लॉगरने व्हिडिओच्या व्हॉईसओव्हरमध्ये चटणी तयार करण्याचा तपशील देखील सांगितला आहे.
सगळ्यात आधी झाडावरुन लाल मुंग्या आणायच्या. हे त्याच्या प्रक्रियेतील सर्वात मोठे आणि साहसी बाब आहे. त्यानंतर मुंग्या आणि त्यांची अंडी एका भांड्यात गोळा केली जातात. मुंग्यांच्या व्हायरल झालेल्या चटणीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की चटणी तयार करणारी स्त्री ही यातील काही जिवंत मुंग्या खातांना दिसत आहे.
या मुंग्या गोळा केल्यानंतर महिला चटणीसाठी इतर साहित्य गोळा करतांना देखील दिसते. वरवंट्यावर सुक्या लाल मिरच्या, लसूण आणि चिरलेला कांदा टाकला असून हे सर्व साहित्य ही महिला हाताने वाटून घेतांना दिसते. यानंतर या मिश्रणात मुंग्या आणि त्यांची अंडी देखील वाटली जातात. यानंतर ही चटणी तयार होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये व्लॉगर या चटणीचा आस्वाद घेताना देखील दिसत आहे. ही चटणी या भागातील लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडते. ताप असलेल्या किंवा आजारी लोकांसाठी ही चटणी आरोग्यदाई समजली जाते.
ओडिशातील लाल मुंगीच्या चटणीला २ जानेवारी २०२४ रोजी जिओ (GI) टॅग देण्यात आला. लाल विणकर मुंग्यांपासून बनवलेल्या या चटणीची रेसिपी वरील व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या मुंग्याही मयूरभंजच्या जंगलात आढळतात.
संबंधित बातम्या