viral News : प्रेमासाठी काहीही! बाटलीला छिद्र पाडून प्रियकराचा प्रेयसीवर पावसाचा वर्षाव; फिल्मी रोमान्सलाही टाकले मागे-viral news rain from hole in bottle couple made their love story viral video ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral News : प्रेमासाठी काहीही! बाटलीला छिद्र पाडून प्रियकराचा प्रेयसीवर पावसाचा वर्षाव; फिल्मी रोमान्सलाही टाकले मागे

viral News : प्रेमासाठी काहीही! बाटलीला छिद्र पाडून प्रियकराचा प्रेयसीवर पावसाचा वर्षाव; फिल्मी रोमान्सलाही टाकले मागे

Aug 10, 2024 08:44 AM IST

viral News : एका जोडप्याने पाण्याच्या बाटलीत छिद्र पाडून त्यातून कृत्रिम पाऊस पाडून रोमँटिक फोटोशूटकेला आहे. त्यांच्या या फोटोशूटने फिल्मी रोमान्सला देखील मागे टाकले आहे. त्यांच्या या फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्रेमासाठी काहीही! बाटलीला छिद्र पाडून प्रियकराचा प्रेयसीवर पावसाचा वर्षाव; फिल्मी रोमान्सलाही टाकले मागे
प्रेमासाठी काहीही! बाटलीला छिद्र पाडून प्रियकराचा प्रेयसीवर पावसाचा वर्षाव; फिल्मी रोमान्सलाही टाकले मागे

Viral News : सोशल मीडियाच्या जगात रोज नवनवीन ट्रेंड लोकांसमोर येत असतात. अलीकडेच एका नवीन ट्रेंडचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो केवळ रोमँटिकच नाही तर खूप क्रिएटिव्ह देखील आहे. इंस्टाग्राम यूजर रिपन_देउरीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका जोडप्याने आपले रोमँटिक फोटोशूट खास बनवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जोडप्याने त्यांच्या फोटोशूटसाठी एक प्लॅस्टिकची पाण्याची बाटली घेतली आहे. या बाटलीला त्यांनी वरच्या भागात अनेक छिद्रे पडली असून त्यात त्यांनी पाणी भरले. मुलाने ही बाटली जोरदार दाबली, त्यामुळे त्यामुळे पावसाच्या सरी प्रमाणे पाण्याचे थेंब बाहेर येऊ लागले. या माध्यमातून त्यांनी या जोडप्याने त्यांच्यावर कृत्रिम पावसाचा वर्षाव केला. यावेळी प्रियकराने प्रेयसीला एका हातात धरले आहे. हा व्हिडीओ पाहून असे वाटते की हा एखाद्या चित्रपटातील रोमँटिक सीन आहे. दोघांच्या या फोटोशूटचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या हृदयाला भिडला आहे. त्यांनी अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिल्या आहेत.

हा व्हिडिओला काही वेळातच मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १० कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ३७ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी 'कल्पकतेचे शिखर' म्हणून त्याची प्रशंसा केली, तर एकाने "कितीही पैसे खर्च केले तरी या प्रकारे फोटोशूट करत येणार नसल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी गंमतीने म्हटले की, आता लोकांना अशा प्रकारे पाणी वाया घालवण्याचे कारण मिळाले आहे.

हा व्हिडिओ केवळ एक ट्रेंड नाही तर साध्या गोष्टींचा वापर करून अनोखे आणि रोमँटिक दृश्य कसे तयार केले जाऊ शकतात हे दर्शविते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे असे व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहेत.

विभाग