Viral news: 'इथे फक्त उच्च दर्जाचेच अधिकारी करू शकतात लघवी', टॉयलेटमधील पाटी पाहून संतापले नागरिक, फोटो व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news: 'इथे फक्त उच्च दर्जाचेच अधिकारी करू शकतात लघवी', टॉयलेटमधील पाटी पाहून संतापले नागरिक, फोटो व्हायरल

Viral news: 'इथे फक्त उच्च दर्जाचेच अधिकारी करू शकतात लघवी', टॉयलेटमधील पाटी पाहून संतापले नागरिक, फोटो व्हायरल

Published Jul 26, 2024 02:52 PM IST

Viral news : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ५ युरिनल दिसत असून त्यातील पहिल्या दोन वर ते फक्त उच्च अधिकाऱ्यांसाठी राखावी असल्याचं लिहिलं आहे. या फोटोवरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

'इथे फक्त उच्च दर्जाचेच अधिकारी करू शकतात लघवी', टॉयलेटमधील पाटी पाहून संतापले नागरिक, फोटो व्हायरल
'इथे फक्त उच्च दर्जाचेच अधिकारी करू शकतात लघवी', टॉयलेटमधील पाटी पाहून संतापले नागरिक, फोटो व्हायरल

Viral news : जर तुम्हाला अचानक लघवी करण्याची तीव्र इच्छा झाली असेल, आणि तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात जाल. मात्र, तुम्ही तेथे गेल्यावर तुम्हाला ते स्वच्छतागृह केवळ उच्च अधिकाऱ्यांसाठी राखीव असल्याचं समजल्यावर तुमचं डोकं नक्कीच फिरणार. तुम्ही म्हणाल टॉयलेटमधील युरीनल कोण कशाला राखीव ठेवेल ? पण, हे झाले आहे. सध्या सोशल मिडियावर या बाबतची एक पोस्ट व्हायरल होत असून या पोस्टने खबळल उडाली आहे. एक स्वच्छता गृहात पाच युरीनल असून त्यातील पहिले दोन हे 'रँक-१' च्या अधिका-यांसाठी' राखीव ठेवले असून सर्वसामणे नागरिकांना त्यात लघुशंका करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा फोटो व्हायरल होत असून नेमका कुठला आहे याची पडताळली होऊ शकली नाही.

सध्या जगात सामानतेच्या हक्कासाठी मोठा लढा उभारला जात आहे. बांग्लादेशमध्ये आरक्षण काढण्यासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. मात्र, टॉयलेटमध्ये अधिकाऱ्यांसाठी असलेल्या या आरक्षणामुळे अनेक जण चक्रावले असून यावर टीका केली जात आहे. मुदित गुप्ता नावाच्या 'एक्स' यूजरने हा फोटो शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये पाच युरिनल दिसत आहेत. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये पहिल्या दोन युरिनलवर 'फक्त वर्ग-१ अधिकाऱ्यांसाठी राखीव' असे लिहिलेले दिसत आहे. वरवर पाहता इतर ३ युरीनल हे सामान्य नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

पोस्टमध्ये नोंदवलेल्या टाइम स्टॅम्पनुसार, हा फोटो २१ जुलै २०२४ रोजी म्हणजेच रविवारी संध्याकाळी ४.२१ वाजता काढण्यात आला आहे. या फोटोवर पोस्ट करतांना एका यूझरने लिहिले आहे की, 'कृपया पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि विचार करा की खरी समान आहे का ? एक्सवर करण्यात आलेली ही पोस्ट सोमवारी २२ जुलैला शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला ४ लाख अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ५ हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. तथापि, आत्तापर्यंत हा फोटो कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

युजर्स देत आहेत भन्नाट प्रतिक्रिया

एका यूजरने लिहिले की, 'ब्रिटिश नुकतेच भारत सोडून गेले, पण उच्चभ्रू मानसिकता भारतात अजूनही कायम आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'क्लास-१ अधिकारी खास आहेत. करण सामान्य माणसे लघवी करत नाहीत, एका यूजरने लिहिले की अधियऱ्यांना डायबिटीज आहे, म्हणून ते सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यापासून वाचवत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर