Viral News: बेंगळुरूमध्ये घरांचे भाडे खूप वाढले आहे. बंगळुरूमध्ये दरमहा २५ हजार रुपये भाडे देऊन राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या १बीआर फ्लॅटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्लॅटची लांबी आणि रुंदी पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा मोठा स्कॅम असल्याचे बोलले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण त्याचे दोन्ही हात पसरून तो राहत असलेल्या प्लॅटचा रुंदी दाखवतो. त्यानंतर एका भिंतीला हात आणि दुसऱ्या भिंतीला पाय स्पर्श करून खोलीची लांबी दाखवतो. या खोलीची बाल्कनी अशी आहे की, एकच व्यक्ती त्या ठिकाणी उभा राहू शकतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ एखाद्या कॉमेडी व्हिडिओपेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे.
abhiskks_17 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओवर बऱ्याच लोकांनी आगळ्या-वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की, माझे टॉयलेट यापेक्षा मोठे आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, मुंबईमध्येही सध्या अशीच परिस्थिती होईल. याला वाढती लोकसंख्या जबाबदार आहे. लोकसंख्या ज्या वेगाने वाढत चालली आहे, तितक्यात वेगाने महागाई वाढत चालली आहे. एका व्यक्तीने गंमतीने म्हटले आहे की, एवढ्या छोट्या खोलीचा फायदा असा होतो की, आपण वस्तू खरेदी करू शकत नाही, त्यामुळे पैसे वाचतील.'
याआधी मुंबईतील माटुंगा परिसरात असलेल्या एका घराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो शहरातील वाढते भाडे आणि जागेची गंभीर कमतरता अधोरेखित करतो. या घराला दरमहा ४५ हजार भाडे होते.
संबंधित बातम्या