Viral News : टायर ब्लास्टचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या अपघातात १९ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. अब्दुल रजीद असे हवेत उडालेल्या तरुणाचे नाव असून या घटतेत तो गंभीर जखमी झाला आहे. टायर इतका जोरात फुटला की या स्फोटामुळे अब्दुल हा हवेत उडाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ कर्नाटकातील उडुपी येथील आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. टायर फुटल्याने एखादी व्यक्ती हवेत कधी उडू शकते हे पाहून नेटकरी चांगलेच हैराण झाले आहे. या व्हिडिओवर अनेकांचा विश्वास देखील बसत नव्हता.
व्हिडिओमध्ये अब्दुल रजीद हा गाड्या दुरुस्त करतो. तो दुकानात काम करत असतांना एका मोठ्या टायरमध्ये हवा भरत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा टायर काही वेळाने इतक्या जोरदार फुटला. या स्फोटामुळे व वाऱ्याच्या वेगामुळे अब्दुल हवेत उंच उडाला व काही अंतरावर जाऊन पडला. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. या स्फोटात अब्दुल गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अब्दुल हा खासगी स्कूल बसच्या टायरचे पंक्चर दुरुस्त करत होता. याच दरम्यान हा अपघात झाला. ही घटना २१ डिसेंबर रोजी घडली. कोस्टल जिल्ह्यातील कोटेश्वर भागाजवळ राष्ट्रीय महामार्ग ६६ वर रस्त्याच्या कडेला त्याचे टायर दुरुस्तीचे दुकान आहे.
दुसरीकडे, कर्नाटकातील नेलामंगला येथे झालेल्या भीषण अपघात कारवर क्रेंन कोसळली. या अपघात सांगली येथील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला. यावेळी अपघातग्रस्त ट्रक चालकाने समोर असलेल्या कारला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकमधील क्रेन कारवर पडून कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज देखील तपासले जात आहे.
संबंधित बातम्या