काय सांगता ! चक्क कंडोम आणि झुरळाचा वापर करून केली फसवणूक; आरोपीने ६३ हॉटेल्सना लावला चुना
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  काय सांगता ! चक्क कंडोम आणि झुरळाचा वापर करून केली फसवणूक; आरोपीने ६३ हॉटेल्सना लावला चुना

काय सांगता ! चक्क कंडोम आणि झुरळाचा वापर करून केली फसवणूक; आरोपीने ६३ हॉटेल्सना लावला चुना

Nov 30, 2024 03:04 PM IST

Viral News : फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, चीनमध्ये एका व्यक्तीने चक्क कंडोम आणि मृत झुरळांचा वापर करून तब्बल ६३ हॉटेलला चुना लावला आहे.

चक्क कंडोम आणि झुरळाचा वापर करून केली फसवणूक; आरोपीने ६३ हॉटेल्सना लावला चुना
चक्क कंडोम आणि झुरळाचा वापर करून केली फसवणूक; आरोपीने ६३ हॉटेल्सना लावला चुना

Viral News : तुम्ही फसवणुकीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पैसे न देण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा काही नेम नाही. चीनमध्ये फसवणुकीची अशीच एक घटना उघडकीस आली असून फसवणूक करणाऱ्याने चक्क फसवणुकीसाठी कंडोम आणि मेलेल्या झुरळांचा वापर केला. या व्यक्तीने तब्बल  ६३ हॉटेलला या माध्यमातून चुना लावला आहे. मोफत राहण्यासाठी  त्याने ही शक्कल लढवल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तीने  ब्लॅकमेल करून नुकसान भरपाईची रक्कम देखील लुबाडली आहे.  फसवणूक करणारा तरुण हा २१ वर्षीय असून त्याला एका  कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार होता. त्यानंतर त्याला  शिष्यवृत्ती देखील मिळणार होती. मात्र,  तसे झाले नाही. त्याच्या जवळचे पैसे संपले. यामुळे त्याने फसवणुकीचा मार्ग अवलंबला.  

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार,२१  वर्षीय तरुणाचाचे नाव साडी जियांग आहे. त्याने सर्वप्रथम हॉटेलमध्ये तपासणी केली. यानंतर सोबत आणलेल्या वस्तू हॉटेलमध्ये  तसेच जेवणात टाकून  तो त्याचं  नाटक सुरू करायचा.  वापरलेले कंडोम, मृत झुरळे आणि केसांच्या पुंजके तो राहत असलेल्या खोलीत व जेवणात टाकून  हॉटेलबद्दल तक्रारी करत होता. तसेच हॉटेलची बदनामी करण्याची धमकी देखील तो देत होता. यानंतर या साठी तो हॉटेल चालकांकडून पैसे देखील गोळा करायचा.  गेल्या वर्षभरापासून तो  ३०० हून अधिक हॉटेलमध्ये थांबल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी ६३ हॉटेल्सची त्याने आर्थिक फसवणूक केल्याचं देखील उघड झालं आहे.  

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, १० महिन्यांच्या आत जियांगने अनेक हॉटेल्समध्ये गेला.  अनेकदा तो एका दिवसात तीन-चार हॉटेलमध्ये चेक इन करत होता.  हॉटेलमध्ये त्याने आणलेले सामान टाकून तो तक्रारी करत असायचा. खोलीत  डास व  कीटकांबद्दल सांगून  हॉटेल व्यावसायिकांना सोशल मीडियावर त्यांचा पर्दाफाश करू, अशी धमकी देत होता.  त्या बदल्यात तो हॉटेलमध्ये मोफत राहण्याची मागणी किंवा पैशांची मागणी करायचा.

असे करून त्याने अनेक हॉटेल्सची फसवणूक केली. हॉटेल व्यावसायिकांनी भीतीपोटी त्याची तक्रार केली नाही. अशा प्रकारच्या घटनेबाबत दोन्ही हॉटेलचे कर्मचारी एकमेकांशी बोलू लागले तेव्हा जियांगचा पोल उघडकीस आला. हॉटेलमधील दोन वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांनी हीच तक्रार सांगितल्यावर हॉटेल व्यावसायिकही एकमेकांशी बोलू लागले. यानंतर तो तोच ग्राहक असल्याचे निष्पन्न झाले, ज्याने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन अशी फसवणूक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर