man masturbates into ice cream in telangana : तेलंगणामधून एक धक्कादायक आणि किळसवाना व्हिडिओ समोर आला आहे. एका आईस्क्रीम विक्रेत्याला सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करताना पकडण्यात आले आहे. हे प्रकरण तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील असून पोलिसांनी आईसक्रीम विक्रेत्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळूराम कुरबिया असे आरोपीचे नाव आहे. तो नेळकोंडा येथील मूळचा रहिवासी आहे. तो गेले काही दिवसांनपासून आईस्क्रीम विकत होता. दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने त्याला आक्षेपार्ह कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद केले आहे. कुरबिया हा मूळचा राजस्थानचा आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी हा व्हिडिओ पहिला असून त्याच्या स्टॉलची तपासणी केल्यानंतर कुर्बियाला पोलिसांनी अटक केली आहे. हा व्हिडिओ येथील आंबेडकर सेंटरमधील आहे, जिथे काळूराम कुरबिया हा हस्तमैथुन करताना आढळला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक संतापले आहेत.
दरम्यान, एका अन्न निरीक्षकाने आरोपीच्या स्टॉलवरून नमुने गोळा केले आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम २९४ नुसार कुरबिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्हिडिओमध्ये पाहिलेल्या कृत्याचे नेमके स्वरूप उघड केले नाही परंतु त्यात अयोग्य वर्तनाचा समावेश असल्याचे सांगितले.
संबंधित बातम्या