Viral news : जगभरात फास्ट फूड खाण्याचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फास्ट फूड हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगितलं जातं तसेच त्याचे परिमाण शरीरावर विपरीत होत असल्याचं माहिती असतांना देखील जगात मोठ्या प्रमाणात लोक हे फास्ट फूड खाण्यासाठी तयार असतात. विशेषत: तरुण वर्ग फास्ट फूड खाण्यासाठी नेहमीच पुढे असतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की महिनाभर रोज हे फास्ट फूड खावे लागले तर काय होईल? २००४ मध्ये, चित्रपट निर्माता मॉर्गन स्परलॉकने फास्ट फूडचे व्यसन व त्याचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी एक प्रयोग केला. त्याचा हा प्रयोग सध्या व्हायरल झाला आहे.
त्याच्या 'सुपर साइज मी' या माहितीपटात त्याने ३० दिवस दररोज दिवसातून तीन वेळा मॅकडोनाल्डचे जेवण खाल्ले. या खान्यामुळे परंतु जे परिणाम समोर आले ते खूपच धक्कादायक होते. नियमांचे पालन करून, स्परलॉकने कमीतकमी एकदा मॅकडोनाल्डच्या मेनूमधून किमान एक जेवण खाल्ले. अवघ्या पाच दिवसांनंतर त्याचे वजन ९.५ पौंडांनी वाढले आणि नंतर २१ दिवसांनी त्याचे एकूण २४.५ पौंड झाले होए. याशिवाय त्याच्या शरीरातील चरबीही ११ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढली होती, तर कोलेस्टेरॉलची पातळी १६८ वरून २४० झाली.
NDTV च्या रिपोर्टनुसार, एका महिन्यात त्याने ६५ हजार डॉलर्स खर्च केले आणि फक्त मॅकडोनाल्डचे फास्ट फूड खाल्ले. या काळात त्यांना शरीरावर गंभीर परिणाम झाले. त्याला अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागले.
डोकेदुखी, नैराश्य, मूड बदलणे इत्यादी समस्यांना त्याला सामोरे जावे लागले. त्याच्या या प्रयोगामुळे डॉक्टरांनाही स्परलॉकच्या शरीराची काळजी वाटू लागली होती. त्याचे यकृत खराब होण्याची शक्यता होती करण त्याची चरबी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्याला मॅकडोनाल्डच्या फास्टफूडचे व्यसन देखील लागले आणि ते न मिळाल्याने त्याला सुस्त देखील वाटत असे. स्परलॉकच्या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप लक्ष वेधून घेतले आणि २२ दशलक्ष डॉलर्सची मोठी कमाई देखील त्याने केली.
संबंधित बातम्या