घरी राहून बायकोचं तोंड किती वेळ बघणार? रविवारीही ड्युटी करा! उद्योगपती सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यामुळं वाद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  घरी राहून बायकोचं तोंड किती वेळ बघणार? रविवारीही ड्युटी करा! उद्योगपती सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यामुळं वाद

घरी राहून बायकोचं तोंड किती वेळ बघणार? रविवारीही ड्युटी करा! उद्योगपती सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यामुळं वाद

Jan 10, 2025 09:19 AM IST

Viral News : प्रसिद्ध उद्योगपती आणि एल अँड टीचे चेअरमन सुब्रमण्यम यांच वक्तव्य संध्या चर्चेत आहे. त्यांनी रविवारी देखील काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच स्पर्धेत टिकण्यासाठी आठवड्यातून ९० तास काम करा असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

घरी राहून बायकोचं तोंड किती वेळ बघणार? रविवारीही ड्युटी करा; उद्योगपती सुब्रमण्यम यांची मुक्ताफळे
घरी राहून बायकोचं तोंड किती वेळ बघणार? रविवारीही ड्युटी करा; उद्योगपती सुब्रमण्यम यांची मुक्ताफळे

l and t chairman subrahmanyan comments : प्रसिद्ध उद्योगपती आणि एल अँड टीचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम यांनी दिलेल्या विचित्र सल्याची सध्या चर्चा होत आहे. तुम्ही घरी बसून काय करता ? तुम्ही तुमच्या बायकोचे तोंड किती वेळ बघू शकता ? तर बायका देखील तुमचे तोंड कितीवेळ बघणार त्यामुळे रविवारी देखील ऑफिसला या आणि काम करा. स्पर्धेत टिकायचे असल्यास आठवड्यातून ९० तास काम करा असे सुब्रमण्यम म्हणाले. त्यांना  कंपनीच्या सहा दिवसांच्या कामकाजाच्या धोरणाविषयी प्रश्न  विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. त्यांचे हे वक्तव्य सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.  

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी या चर्चेला सुरुवात केली होती. आठवड्याला ७० तास काम करण्याचे त्यांनी म्हटलं होत. त्यांच्या या व्यक्तव्याची देखील चर्चा झाली होती. दरम्यान,  सुब्रमण्यम यांना देखील आठवड्यातून ५ दिवस काम करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देतांना  सुब्रमण्यम यांनी एक पाऊल पुढे टाकत आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे.  व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत त्यांनी म्हटलं की,  "मला दु:ख आहे की ते कर्मचाऱ्यांना रविवारी काम करायला बोलावू शकत नाही. तुम्हाला रविवारी देखील काम करण्यास भाग पाडता आले असते तर मला आनंद झाला असता. कारण मी स्वत: रविवारी काम करतो."

पुढे सुब्रमण्यम म्हणाले, घरी राहून 'तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ बघणार आहात?',  तुम्ही घरी बसून काय करता? तुमची बायको तुम्हाला किती वेळ बघणार? त्यामुळे रविवारी देखील ऑफिसला जा आणि काम करा. "

सुब्रमण्यम यांनी त्यांचा  एका चिनी व्यक्तीशी झालेल्या संभाषणाचा किस्सा सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीने दावा केला की चीन अमेरिकेला मागे टाकू शकतो कारण चिनी कर्मचारी आठवड्यातून ९०  तास काम करतात तर अमेरिकन ५०  तास काम करतात. जगात अव्वल स्थान मिळवायचे असेल तर आठवड्यातील ९० तास काम करावे लागते. त्यामुळे आपण देखील आठवड्यातून ९० तास काम करुयात.  

एल अँड टी समूहाने अध्यक्ष सुब्रमण्यम यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करत  राष्ट्रउभारणीसाठी समूह कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. सीएनबीसी-टीव्ही १८ ला दिलेल्या निवेदनात एल अँड टीच्या प्रवक्त्याने म्हटलं  की, "राष्ट्रउभारणी हा आमच्या कंपनीचा उद्देश आहे.  गेल्या आठ दशकांहून अधिक काळापासून आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, औद्योगिक व  तांत्रिक क्षमतेला नव्याने आकार देत आहोत. आमचे असे मत आहे की हे भारताचे दशक आहे. विकसित राष्ट्र बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

सुब्रमण्यम यांचा हा व्हिडिओ सर्वप्रथम रेडिटवर शेअर करण्यात आला होता. यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक युजर्स टीका करत आहेत. लोक त्यांच्या वक्तव्याचा संबंध कर्मचाऱ्यांच्या शोषणाशी जोडत आहेत. पत्नीला घरी पाहणं हे त्यांना पचनी पडलं नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर