Viral News : किस किंवा चुंबन सामान्यत: आपले प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम मानलं जातं. मात्र, चुंबन घेतल्याने कुणाचा जीव जाऊ शकतो यावर कुणाचा विश्वास देखील बसणार नाही. बोस्टनस्थित एका महिलेच्या बाबती हे घडलं आहे. यामुळं या महिलेने पुरुषांसाठी तीन कठोर नियम बनवले असून या बाबत तिने इंटरनेटवर माहिती देखील दिली आहे. या महिलेची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. ही महिला मास्ट सेल अॅक्टिव्हेशन सिंड्रोम (एमसीएएस) नावाच्या आजाराने ग्रस्त असल्याचं तिनं सांगितलं आहे. संभाव्य धोक्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कॅरोलिन क्रे क्विनने आपल्या जोडीदारासाठी काही कडक नियम बनवले आहेत. तिच्यासोबत राहण्याबाबत इच्छुकांना हे नियम गांभीर्याने पाळावे लागणार आहे.
या महिलेने टिकटॉकवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात क्विनने तीन नियम सांगितले आहेत. "पहिला नियम असा आहे की ते मला किस करण्यापूर्वी २४ तास आधी पुरुषाने सहा अॅनाफिलेक्टिक एलर्जीन फूड (शेंगदाणे, झाडाचे शेंगदाणे, तीळ, किवी, मोहरी किंवा सीफूड) खाऊ शकणार नाहीत. दुसरा नियम म्हणजे तिला किस करण्यापूर्वी पुरुषांनी तीन तास काहीही खाऊ नये. तर तिसरा नियम म्हणजे तिला किस करणाऱ्या व्यक्तीने आधी दात घासावेत.
क्विनच्या मते, जर हे सर्व नियम पाळले गेले नाहीत. नाही तर संबंधित पुरुषाचा सुखद अनुभव दु:खद स्वप्नात बदलू शकतो. न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार, तिच्या आजारामुळे पेशीमध्ये काही बदल होऊन गंभीर एलर्जीन तयार करतात. हे शरीरासाठी धोकादायक असू शकतं. क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, या आजारामुळे अतिसार, उलट्या आणि धाप लागणे असे आजार होऊ शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे जीवघेणा अॅनाफिलेक्सिस आजार देखील होऊ शकतो. क्विनला २०१७ मध्ये एमसीएएस आजारचे निदान झाले होते. तिला त्रास होऊ नये यासाठी तिने स्वत:ला काही नियम घालून दिले असून त्याचे ती तंतोतंत पालन करते.
तिने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "मुलांना किस करणे नक्कीच एक धोका आहे. पण रोजचं जगणंही माझ्यासाठी असंच आहे. "पण मी थोडा विचारपूर्वक जोखीम घेणे पसंत करते. एक परिपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मी हा धोका पत्करते असे ती म्हणाली. क्विन पुढे म्हणाली, "जर संबंधित पुरुष मला किस करण्यासाठी काही नियम पाळत असेल तर तो नक्कीच तुमची काळजी घेणारा असेल."