Viral news: लाखो रुपये खर्च करून बनला कुत्रा; तरीही इच्छा पूर्ण झाली नाही; आता 'या' माणसाला व्हायचे आहे लांडगा आणि पांडा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news: लाखो रुपये खर्च करून बनला कुत्रा; तरीही इच्छा पूर्ण झाली नाही; आता 'या' माणसाला व्हायचे आहे लांडगा आणि पांडा

Viral news: लाखो रुपये खर्च करून बनला कुत्रा; तरीही इच्छा पूर्ण झाली नाही; आता 'या' माणसाला व्हायचे आहे लांडगा आणि पांडा

May 27, 2024 08:02 AM IST

Viral news : जपानमधील टिको या व्यक्तीला वेगवेगळ्या प्राण्यांचे कपडे घालण्याची आवड आहे. या छंदाचे वास्तवात रुपांतर करण्यासाठी त्याने १२ लाख रुपये खर्च केले. तो सध्या शस्त्रक्रिया करून माणसाचा कुत्रा झाला आहे.

जपानमधील टिको या व्यक्तीला वेगवेगळ्या प्राण्यांचे कपडे घालण्याची आवड आहे. या छंदाचे वास्तवात रुपांतर करण्यासाठी त्याने १२ लाख रुपये खर्च केले.
जपानमधील टिको या व्यक्तीला वेगवेगळ्या प्राण्यांचे कपडे घालण्याची आवड आहे. या छंदाचे वास्तवात रुपांतर करण्यासाठी त्याने १२ लाख रुपये खर्च केले.

Viral news : लोक आपले छंद पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा आणि वेळ खर्च करण्यास तयार असतात. जपानमधील टिको नावाच्या व्यक्तीलाही असाच छंद आहे. टोकोला वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेषभूषा करायला आवडते. हा छंद प्रत्यक्षात आणण्यासाठी आणण्यासाठी त्याने १२ लाख रुपये खर्च केले. इतका पैसा खर्च करून टिको माणसातून कुत्रा झाला आहे. मात्र, तो याला आता कंटाळला आहे. त्याला आता लांडगा आणि पांडा वह्याचे आहे. टिकोने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर माणसातून प्राण्यांमध्ये झालेल्या परिवर्तनाची संपूर्ण कथा सांगितली आहे.

SSC Result : विद्यार्थ्यांनो बेस्ट ऑफ लक! आज दहावीचा निकाल दुपारी १ वाजता होणार जाहीर! असा पाहा निकाल

बालपणीची इच्छा पूर्ण झाली पण आव्हाने कायम

टिकोने सांगितले की लहानपणापासूनच त्याला प्राणी बनायचे होते. त्याला कुत्र्या होऊन फिरायचे होते. एका जपानी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना टिकोने सांगितले की, त्याला आता नवीन प्राण्याचे रूप धारण करायचे आहे. तो म्हणाला की त्याला चार प्राण्यांचे वेश धारण करायचे आहे. यापैकी दोन प्राण्यांमध्ये रूपांतर होणे शक्य नाही. यामागे त्याने तर्कशुद्ध कारणे देखील दिली आहेत.

Cyclone Remal : आयएमडीची महत्वाची अपडेट! चक्रीवादळ रेमलची तीव्रता होणार कमी

टिकोच्या म्हणण्यानुसार, त्याला कुत्रा झाल्याने त्रास होत आहे. कुत्र्यांच्या आणि माणसांच्या हाडांच्या रचनेत खूप फरक असल्याने त्याला त्रास होत आहे. विशेषत: या दोघांच्या पाय आणि हात वाकवण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक आहे. त्यामुळे टोकोला कुत्र्यासारखे चालताना खूप त्रास होतो. ड्रेसच्या फरवर एकदा घाण सचली की साफ करणे देखील खूप कठीण होऊन बसते.

टिको म्हणाला, "मला आणखी वेगवेगळ्या प्राण्यांचे रूप धरण कारायचे आहे. मला अस्वल किंवा पांडा व्हायचे आहे. या सोबत मला कोल्हा, लांडगा आणि मांजर देखील आवडतात. परंतु या लहान प्राण्यांमध्ये स्वत:ला रूपांतरित करणे अवघड आहे.

कोली जातीचा कुत्रा बनणे का निवडले?

टिकोने सांगितले की त्याला कोली जातीचे कुत्रे आवडतात. कोली एकदम खरी दिसते. "मला विशेषतः चार पायांवर चालणारे प्राणी आवडतात. मोठ्या प्राण्यांचे वेशांतर करणे हे अगदी नैसर्गिक आणि सोपे आहे. म्हणूनच मी कोली जातीचा कुत्रा बनणे पसंत केले आहे. कोली जातीच्या कुत्राचे लांब केसांमुळे माझी ओळख होऊ शकत नाही. लांब केस असलेले प्राणी लोकांमध्ये गोंधळ निर्माण करतात. तसेच ते त्यांना ओळखू देखील शकत नाहीत.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर