Viral news : भारतीय पुरुष रोमान्स करण्यात 'ढ'; महिलेनं सांगितलं भारतीय न आवडण्याचं कारण; पोस्ट व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : भारतीय पुरुष रोमान्स करण्यात 'ढ'; महिलेनं सांगितलं भारतीय न आवडण्याचं कारण; पोस्ट व्हायरल

Viral news : भारतीय पुरुष रोमान्स करण्यात 'ढ'; महिलेनं सांगितलं भारतीय न आवडण्याचं कारण; पोस्ट व्हायरल

Updated Jul 24, 2024 01:32 PM IST

Viral news : एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात तीनं भारतीय पुरुषांवर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेच्या मते भारतीय पुरुषांना रोमान्स कसा करायचा हे माहित नाही. त्यामुळे ती त्याला डेट करत नाही. याची तीन कारणेही तिने सांगितली.

भारतीय पुरुष रोमान्स करण्यात 'ढ'; महिलेने सांगितलं भारतीय न आवडण्याचं कारण; पोस्ट व्हायरल
भारतीय पुरुष रोमान्स करण्यात 'ढ'; महिलेने सांगितलं भारतीय न आवडण्याचं कारण; पोस्ट व्हायरल

Viral news : सोशल मीडियावर अनेक डेटिंग साइट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत, जिथे मुले आणि मुली त्यांच्या आवडीच्या व्यक्तीला डेट करत असतात. या डेट नंतर त्यांच्यात प्रेम देखील फुलू लागते. मात्र, रिलेशनशिप कोच असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत या महिलेनं भारतीय पुरुषांवर गंभीर आरोप केले आहेत. तीने म्हटले आहे की ती भारतीय पुरुषांना डेट करत नाही. यामागे तिने तीन कारणे देखील सांगितले आहेत. या महिलेचे म्हणणे आहे की भारतीय पुरुषांना रोमान्स कसा करायचा हे माहित नाही. ते मुलींचे छोटे हावभाव देखील समजू शकत नाहीत. घराची काळजी कशी घ्यायची हेही त्यांना कळत नाही. महिलेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या महिलेच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी उत्तर दिले आहेत. काही जणांनी तिच्या विधानावर आक्षेप घेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तिच्याशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी त्याच्या विधानांना "हास्यास्पद" म्हटले आहे. चेतना चक्रवर्ती असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत भारतीय पुरुषांवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, "माझ्या क्लायंटला तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करत असते, जेणेकरून ते डेटिंगच्या या वेड्या जगातून पुढे जाऊन त्यांचे नाते फुलवू शकतील. याचे कारण म्हणजे मी या सर्व गोष्टींचा सामोरे गेले आहे. मी अशा अनेक युक्त्या देखील वापरल्या आहेत, ज्याने रिलेशन सुधारले आहे.

भारतीय पुरुषांना डेट करू नका

चेतना पुढे म्हणाली, "मी आता भारतीय पुरुषांना डेट करत नाही आणि याची ही तीन मुख्य कारणे आहेत. चक्रवर्ती म्हणाली की भारतीय पुरुषांना "संभाषण कसे करावे" हे शिकवले गेले नाही. "जेव्हा ते एखाद्या मुद्द्यावर चर्चा करू शकत नाहीत, तेव्हा ते गप्प बसतात आणि त्यांच्या समोरील महिलेला ते तर्कहीन आणि आक्रमक म्हणू लागतात. काहीवेळा ते वाईट भाषेचा देखील अवलंब करतात.

दुसरे कारण सांगताना चेतना म्हणाली, "त्यांना रोमान्स करता येत नाही. त्यांच्यासाठी रोमान्स म्हणजे महिन्याला फक्त एक डिनर डेट. मात्र, रोमान्स म्हणजे "प्रियसईचे रोज छोटे-छोटे हावभाव समजने, जे भारतीय पुरुषांना कधीच समज नाहीत. याशिवाय भारतीय पुरुषांना घराची काळजी कशी घ्यावी हे देखील कळत नाही. ते एखाद्यावर उपकार करत असल्याचा विचार करून वागू लागतात.

महिलेने व्हिडिओ शेअर केल्यापासून त्याला १२ हजार लाईक्स आणि ७९,००० व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने म्हटले की, "मी यावर पूर्णपणे असहमत आहे.. मी एका भारतीय माणसाशी लग्न केले आहे आणि तो खूप छान आहे. काही मुद्यांवर मतभेद असू शकतात. कदाचित तुम्ही तुमच्या वाईट अनुभवांबद्दल बोलत असाल. पण तुम्ही असे लेबल लावू नये!!” दुसरा म्हणाला, "हा भारतीय पुरुषांचा मुद्दा नाही. हा लिंगाचा मुद्दा आहे."

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर