Indian Currency: एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्याला आजोबाच्या काळातील ५०० रुपयांची जुनी नोट सापडल्याचा दावा केला आहे. या वक्तीने असाही दावा केला आहे की, ही नोट त्याच्या आजोबाने त्यांच्या सामनात लपवून ठेवली होती, जी ५० वर्ष जुनी आहे. संबंधित व्यक्तीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या नोटीची त्याला किंमतीपेक्षा जास्त पैसे मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली.
संबंधित व्यक्तीने रेडिट केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘मला माझ्या वडिलांच्या जुन्या पेटीत १९७० च्या दशकातील ५०० रुपयांची जुनी नोट सापडली आहे. या नोटीचा एक भाग गायब झाला आहे. या नोटीचे मला किती रुपये मिळू शकतात, याची कोणाला काही कल्पना आहे का?' फोटोमधील नोट टेपने चिटकवलेली दिसत आहे.
या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एका व्यक्तीने लिहिले आहे की, या नोटीवर १९९२-९७ या काळात रिझर्व्ह बँकेचे संचालक असलेले सी. रंगराजन यांनी स्वाक्षरी दिसत आहे. त्यामुळे ही नोट ५० वर्ष जुनी नसावी. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, ५०० रुपयांची नोट सर्वप्रथम १९८७ मध्ये चलनात आली आणि त्यानंतर १००० रुपयांची नोट चलनात आली. त्यामुळे ही नोट गृहीत धरल्याप्रमाणे १९७० च्या दशकातील असू शकत नाही. ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात ५०० रुपयांची नोट चलनात आली होती आणि ७० च्या दशकात ५०० रुपयांची नोट नव्हती. ती निरुपयोगी आहे. ही नोट आणखी काही दशके सुरक्षित ठेवल्यास त्याचा चांगला परतावा मिळू शकतो, असे एका व्यक्तीने सुचवले.
काहींनी या नोटेची कायदेशीर किंमत ५०० रुपये असू शकते, असे म्हटले आहे. तर काहींनी ती निरुपयोगी ठरू शकते, असा दावा केला आहे. रिझर्व्ह बॅंकेनुसार आणि २०१६ पूर्वीच्या ५०० रुपयांच्या नोटा वैध नाहीत.
एका व्यक्तीने सांगितले की, नोटेच्या स्थितीचा परिणाम त्याच्या मूल्यावरही होऊ शकतो. या नोटेची अवस्था अत्यंत वाईट आहे की, आता या नोटेचे मूल्य खऱ्या अर्थाने संकलक मूल्य नाही, असे ते म्हणाले. काही वेडे अजूनही आपल्या संग्रहात ठेवण्यासाठी त्याच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे देऊ शकतात, असे आणखी एका जणाने म्हटले आहे.
एखादी जुनी नोट विकण्यासाठी oldindiancoins.com या वेबसाइटवर भेट द्यावी. याकरता सर्वात प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर नोटीचा फोटो या प्लॅटफॉर्मवर अपलोड करावा लागेल. ज्या लोकांना ही नोट हवी आहे, ते थेट तुमच्याशी संपर्क करतील.
संबंधित बातम्या