Viral News : महिला आमदाराच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर नवऱ्याचे फोटो; चिडलेल्या पतीने पोस्टरच उतरवले, काय झालं वाचा!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : महिला आमदाराच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर नवऱ्याचे फोटो; चिडलेल्या पतीने पोस्टरच उतरवले, काय झालं वाचा!

Viral News : महिला आमदाराच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर नवऱ्याचे फोटो; चिडलेल्या पतीने पोस्टरच उतरवले, काय झालं वाचा!

Nov 21, 2024 10:44 AM IST

Viral News In Marathi : ‘हा माझा अपमान आहे. त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे आणि आपले फोटो वापरू नयेत’, असा इशारा पतीने आमदार पत्नीला दिला आहे.

Husband photo on hoarding of MLA wife s birthday
Husband photo on hoarding of MLA wife s birthday

Viral News In Marathi : मध्य प्रदेशचे माजी खासदार आणि बसपा नेते कांकर मुंजारे यांनी त्यांच्या पत्नीवर त्यांचे फोटो राजकीय होर्डिंग्ज आणि बॅनरमध्ये वापरणे थांबवले नाही तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा दिला आहे. अनुभा मुंजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमध्ये त्यांचे छायाचित्र वापरल्याबद्दल बसप नेते कांकर मुंजारे यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी ते होर्डिंगही उतरवायला लावले. लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय विचारधारेतील मतभेदांमुळे त्यांनी आमदार पत्नी अनुभा यांना घर सोडण्यास सांगितले होते. सध्या दोघेही वेगळे राहतात.

राजकीय मतभेद

बसपा नेत्याने महाते की, ‘ही अतिशय बेजबाबदार वृत्ती आहे, कारण आमदार अनुभा मुंजारे यांनी माझ्या संमतीशिवाय होर्डिंगवर माझे छायाचित्र वापरले आहे. हा माझा अपमान आहे. त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे आणि आपले फोटो वापरू नयेत. मी वेगळ्या पक्षात आहे आणि ती वेगळ्या पक्षात आहे. मग माझा फोटो कसा वापरला जात आहे? त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात माझे नाव येऊ नये. माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. हे आक्षेपार्ह आहे. मी यावेळेस सोडून देत आहे, एफआयआर दाखल करत नाही. पण, पुन्हा खपवून घेणार नाही.

Viral News : आई-वडील गोरे पण मूल काळे कसे ? नवऱ्याला बसला मोठा धक्का! पितृत्व चाचणीची केली मागणी

कुटुंब आणि राजकारण वेगळे

‘हे सर्व कौटुंबिक प्रकरण आहे का’, असे विचारले असता माजी खासदार मुंजारे म्हणाले की, ‘या घटनेशी माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. राजकारण हे आपल्या तत्त्वांवर आधारित आहे. कुटुंबाचा अर्थ असा होत नाही की, मते मिळवण्यासाठी आणि मतदार संख्या वाढवण्यासाठी त्यांनी माझे नाव वापरावे. त्यांचे नेते त्यांना माझा फोटो वापरण्यापासून कसे रोखत नाहीत?’

आमचा एकमेकांच्या राजकारणाशी संबंध नाही!

पत्नीच्या राजकारणाशी आपला काहीही संबंध नसून, दोघांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असल्याचे मुंजारे यांनी सांगितले. मात्र, कांकर मुंजारे हे आदरणीय नेते असून, त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले, असे अनुभ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. अनुभा मुंजारे यांनी नोव्हेंबर २०२३मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली आणि त्या बालाघाट मतदारसंघातून विजयी झाला. त्यांचे पती कंकर मुंजारे यांनी परसवाडा विधानसभा मतदारसंघातून गोंडवाना सरकार पक्षाचे (जीजीपी) उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कांकर मुंजारे यांनी बालाघाटमधून बसपाचे उमेदवार म्हणून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली, परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांना अवघी ५३००० मते मिळाली. १९८९मध्ये बालाघाट लोकसभा मतदारसंघातून कांकर मुंजारे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर