Viral News : मृत्यूनंतर पतीच्या अफेअरची पत्नीला मिळाली माहिती! संतापाच्या भरात तिनं असं काही केलं की व्हाल हैराण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : मृत्यूनंतर पतीच्या अफेअरची पत्नीला मिळाली माहिती! संतापाच्या भरात तिनं असं काही केलं की व्हाल हैराण

Viral News : मृत्यूनंतर पतीच्या अफेअरची पत्नीला मिळाली माहिती! संतापाच्या भरात तिनं असं काही केलं की व्हाल हैराण

Oct 08, 2024 09:55 AM IST

Viral News : एका माहीलेल्या तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या अफेअरची माहिती मिळाली. पतीने तिची फसवणूक केल्याचे पत्नीला समजताच तिने त्याची राख खाऊन टाकली. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

 मृत्यूनंतर पतीच्या अफेअरची पत्नीला मिळाली माहिती! संतापाच्या भरात तिनं असं काही केलं की व्हाल हैराण
मृत्यूनंतर पतीच्या अफेअरची पत्नीला मिळाली माहिती! संतापाच्या भरात तिनं असं काही केलं की व्हाल हैराण

Viral News : पती पत्नीचं नात हे अतूट असतं. मात्र, काही चुका हे नातं तुटण्यास कारणीभूत ठरतात. अशाच एका घटनेत एका महिलेला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या अफेअर्सची माहिती मिळाली. यानंतर या महिलेचा संताप उफळला. पतीने तिची एक दोन वेळा नाही तर अनेक वेळा फसवणूक केल्याचे समल्यावर तिने रागाच्या भरात पतीची हाडे आणि राख खाल्ली. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने आपल्या पाळीव कुत्र्याच्या विष्ठेत पतीच्या मृतदेहाची राखही मिसळली, नंतर तिने हा सगळा प्रसंग एका पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवला. ही घटना कॅनडा येथील असून ती व्हायरल झाली आहे.

जेसिका व्हाईट असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने तिच्या पुस्तकात लिहिले आहे की, २०१५ मध्ये टेक्सासच्या सहलीदरम्यान तिच्या पतीचे निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर काही वेळातच तिला समजले की, तिचा नवरा बराच काळ तिला फसवत होता, त्यानंतर रागाच्या भरात तिने हे पाऊल उचलले. 'अ विडोज गाईड टू डेड बास्टर्ड' या तिच्या आत्मचरित्रात जेसिका हिने लिहिले आहे की, पतीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर तिने आपल्या पतीच्या आयपॅडचा वापर करून ह्युस्टनमधील एका रुग्णालयाचा नंबर शोधला. मात्र, ह्युस्टन सर्च करतांना तिच्या पुढे ह्युस्टन एस्कॉर्टची माहिती पुढे आली. तिने त्याची हिस्ट्री तपासली असता त्याने अनेक ठिकाणी आणि अनेकवेळा एस्कॉर्ट सर्व्हिस घेतली असून या द्वारे महिलांशी त्याने संबंध ठेवल्याच आणि यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तिने चौकशी केली असता तो सतत तिची फसवणूक करत होता आणि त्याचे अनेक महिलांशी संबंध असल्याच तिला कळलं .

जेसिकाने लिहिले की, जेव्हा जेव्हा तो कामासाठी बाहेर जायचा तेव्हा तो मला सांगायचा की त्याला कामामुळे उशीर होईल, पण प्रत्यक्षात तो दुसऱ्या महिलांशी भेटत होता व मला फसवत होता. तो जेसीकाला त्याच्या संगणकाला देखील हात लावू देत नव्हता. दरम्यान, त्याच्या मृत्यूनंतर मी त्याचा आयपॅड पाहिला तेव्हा मला धक्का बसला. कारण त्यात हजारो अश्लील व्हिडिओ होते, जे कॅटेगरीनुसार फोल्डरमध्ये ठेवण्यात आले होते. त्या नंतर मला कळलं की त्याने अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता जिथे त्याने इतर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते.

'ज्याच्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं होतं, त्याने माझ्यासोबत असं केलं, हे ऐकून मला धक्का बसला. तो मेलेला असल्यामुळे त्याच्याशी भांडून मी माझा रागही काढू शकत नव्हते. हे माझ्यासाठी खूप अवघड झाले. मी धक्क्यातून बाहेर पडू शकले नाही. म्हणून एके दिवशी मी चाकूने त्याची राख भरलेली पिशवी फाडली. 

मग मी माझ्या कुत्र्याच्या विष्ठेत मिसळली. त्यानंतर नंतर मला अपराधी वाटले की मी माझ्या जोडीदाराच्या अस्तिंचा अपमान केला आहे. त्यामुळे मी त्याची राख खाल्ली. जेसिका म्हणाली, "त्याचे अवशेष माझ्या बोटांवर कोरडे वाटत होते. ते बेकिंग पावडरच्या दाण्यांपेक्षा जाड, व मिठापेक्षा दाणेदार होते. मी त्याच्या अस्तीच्या रखेला मातीप्रमाणे जिभेवर ठेवले आणि गिळले.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर