Uttar Pradesh Agra Viral News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवण्यात आली. त्यानंतर लग्नातही त्याने मुलीला पाहिले. परंतु, हनीमूननंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून त्याच्यासमोर आलेल्या पत्नीला पाहून तो शॉक झाला. त्याच्या बायकोने त्यांचे लग्न जमवताना आणि लग्नात अधिक मेकअप केल्यामुळे ती प्रत्यक्षात कशी दिसते, हे त्याला समजू शकले नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच पतीच्या सततच्या टोमण्यांना वैतागून संबंधित महिलेने माहेरी जाऊन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आग्रा फॅमिली कौन्सिलिंग सेंटरमधून ही बाब समोर आली आहे. २०२२ मध्ये आग्रा येथील एका मुलीचे लग्न आग्रा येथील एका व्यक्तीशी झाले. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले, पण जेव्हा पत्नी सासरी पोहोचली तेव्हा, तिचा रंग पाहून नवरा अस्वस्थ झाला. नवरा म्हणतो की, जेव्हा मी तिला सुरुवातीला बघितले होते की, तेव्हा ती गोरी दिसत होती. पण ती सावळी दिसत आहे आणि तिचे डोळे लहान- मोठे आहेत, असेही त्याने म्हटले आहे.
पतीने असा आरोप केला आहे की, फोटोमध्ये मुलगी सुंदर दिसत होती. परंतु, प्रत्यक्षात ती तशी नाही. माझी फसवणूक झाली. यावरून पती- पत्नीमध्ये वाद सुरू झाला आणि हा वाद इतका वाढला की, दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. सततच्या वादाला वैतागून महिला पतीला सोडून माहेरी निघून गेली. तसेच पतीविरोधात सासरच्या हुंडा आणि छळाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता दोघांमधील वादाचे खरे कारण काहीतरी वेगळे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोघांनाही कुटुंब समुपदेशन केंद्रात पाठवण्यात आले. त्यामुळे दोघांमधील वाद मिटवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांनाही कौटुंबिक समुपदेशन केंद्रात समजावून सांगण्यात आले आहे. नवरा म्हणाला की, मेकअपमुळे त्याला पत्नीचा रंग समजू शकलेला नाही. नवऱ्याचे म्हणणे आहे की मेकअपमुळे त्याला पत्नीचा रंग दिसत नव्हता आणि जेव्हा त्याने लग्नानंतर बायकोला पाहिल्यानंतर तो अस्वस्थ झाला. यावरून पतीने पत्नीवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केल्याने वाद वाढला. त्यानंतर पतीचे टोमणे वाढल्याने बायकोने नवऱ्याचे घर सोडले.