Guests Fighting Over Non-Veg Food Viral Video: भारतात सध्या लग्नसराई सुरू असून सर्वत्र लग्नाचा धूमधडाका सुरू आहे. या विवाह समारंभाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये लग्नात होणारी भांडणांपासून वऱ्हाडी मंडळींचा भन्नाट डान्स आणि वधू-वरांच्या जयमाला कार्यक्रमात होणारे ऊप्स मोमेंट ते जेवणावळीत होणारी चेंगराचेंगरी आदिचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्न समारंभात जेवणासाठी होणारी भांडणे सामान्य़ झाली आहेत.
त्यामुळे दोन गुलाब जामुनहून अधिक न मिळाल्याने झालेली हाणामारी असो की, मटर पनीरची भाजी संपल्यानंतरचे भांडण. इतकेच नाही तर विवाह समारंभात नॉन-व्हेज साठीही वऱ्हाडी मंडळींमध्ये घमासान पाहायला मिळत आहे. आता लग्नसराईत असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये लोक नॉन-व्हेज काउंटरवर प्लेट घेऊन तुटून पडले. व्हेज काउंटरकडे कोणी फिरकलेही नाहीत.
व्हायरल होत असलेल्या लग्नाच्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लग्नात आलेले नातेवाईक कशा प्रकारे अदाशासारखे नॉन-व्हेज काउंटरवर तुटून पडले. जसे एखाद्या मंदिरात महाप्रसाद आहे. हातात प्लेट घेऊन एकमेकांवर चढताना दिसत आहेत. नॉन-व्हेज काऊंटरवर वाढणाऱ्या वेटर्सची पळापळ होत आहे. काउंटर पर नॉन-व्हेज पदार्थ येताच लोक आपल्या प्लेटमध्ये भरून घेऊन जात आहेत. यासाठी त्यांच्यात चढाओढ होताना दिसत आहे. यामध्ये चिकन टिक्का आणि कबाब आदि नॉन-व्हेज डिश दिसत आहे. दुसरीकडे व्हिडिओमध्ये दिसत आहे की, व्हेज काउंटरकडे कोणी ढुंकूनही पाहताना दिसत नाही. तेथील वेटर्स तोंड पाडून उभे आहेत.
व्हेज काउंटरवर भज्जी, पकोडे, आलू टिक्की आणि सर्व चाट आयटम दिसत आहेत. मात्र नॉन-व्हेजसमोर हे पकवान फिक्के पडताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओचा कमेंट बॉक्स बंद करण्त आला आहे. सोशल मीडियावर सध्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ते व्हिडिओ लोक आवडीने पाहत आहेत. सांगितले जात आहे की, भारतात ४८ लाख लग्ने होणार आहेत. ज्यावर ५ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च होण्याचा अंदाज आहे.