Viral News: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन काहीतरी पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती आपल्या लग्नात असे काही करतो, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
आजच्या तरुणांना ऑनलाइन गेमिंगची आवड आहे. परंतु, अनेकदा त्यांच्या छंदाची मर्यादा ओलांडते, जेव्हा ते गेम खेळण्यासाठी विचित्र गोष्टी करायला लागतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, संबंधित तरुण स्वतL:च्या लग्नामध्ये आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळताना दिसत आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
@Muskan_nnn या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर आहे. या व्हिडिओत संबंधित तरुण दोन मित्रांसोबत लुडो खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक पुजारी आणि लग्नाचा फोटोग्राफर देखील दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ही भावाची प्रायोरिटी आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ५ लाख लोकांनी पाहिले आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की, असे व्हिडिओ पाहून तुमचे मुले देखील हेच करतील. त्यांना समजावण्यचा प्रयत्न करा. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, लग्नाच्याआधीच नवरदेवाने सगळ्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत. आणखी एका युजरने लिहिले आहे की, अशा व्यक्तीसोबत लग्न करणे म्हणजे धोकादायक आहे, जो महत्त्वाच्या क्षणी मित्रांसोबत मोबाईलवर लुडो गेम खेळत आहे. नवरदेवाचा व्हिडिओ पाहून कोणीही हसल्याशिवाय राहणार नाही.
संबंधित बातम्या