Delhi Viral news : आज बहुतांश शाळांमध्ये मुली आणि मुळे एकत्र शिकतात. वर्गात मुला मुलींमध्ये भेद न करता त्यांना मागे पुढे बसवले जाते. मात्र, दिल्लीत एका शाळेत ही बैठक व्यवस्था मुलांसाठी त्रासदायक ठरत आहे. याचे कारण ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. मुलांनी या बाबत थेट मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे. तसेच वर्गात मुलींची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्याची मागणी केली आहे. त्यांचा हा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
दिल्लीतील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गटाने मुलींना स्वतंत्र रांगेत बसण्यासाठी मुख्याध्यापकांना अधिकृत अर्ज दिला आहे. मुलांनी दावा केला की त्यांच्या वर्गातील मुलींनी प्रत्येक रांगेत पहिल्या दोन जागा व्यापल्या आणि त्यांना बसू दिले नाही. जेव्हा मुले मागे बसतात तेव्हा समोर बसलेल्या मुलींचे केस त्याच्या समोर येतात. यामुळे त्यांना त्रास होत असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. यामुळे मुलींची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या या पत्रावर सोशल मीडियावर लोकांना आवडले असून त्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या पत्राचा फोटो ऑनलाइन शेअर करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, माझा धाकटा भाऊ आणि त्याच्या वर्गातील मुलांना वेगळ्या रांगेत बसायचे आहे. मुख्याध्यापकांना लिहिलेल्या या अर्जात असे लिहिले आहे की, आम्ही सर्व मुले तुम्हाला (मुख्याध्यापक) विनंती करतो की, मुलींनी वर्गातील पहिल्या दोन रांगा जागा घेतल्या आहेत. त्या ऐवजी त्यांना स्वतंत्र लाइन द्या. पत्रात मुलांनी असे म्हटले आहे की मुलींच्या मागे बसलेल्या मुलांना मुलींच्या लांब केसांचा त्रास होतो. केस वारंवार त्यांच्या डेस्कवर उडून येतात. त्यामुळे मुलांचे लक्ष विचलित होतंन. या अर्जावर त्या दिवशी वर्गात उपस्थित असलेल्या मुलांच्या सह्या देखील आहेत.
सोशल मीडियावर हे पत्र शेअर केल्यापासून याला अनेकांनी मोठी पसंती दिली आहे. नेटकरी या पत्रावर कमेंट करत आहेत. काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की काही दिवसांनी मुले एकत्र बसवण्याची मागणी करतील.
या पोस्टवर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, हे पत्र वाचून मुख्याध्यापक मोठ्याने हसले असतील, तुझा भाऊ खूप गोंडस असावा. दुसऱ्या युजरने लिहिले की, मी लिहिलेल्या ऍप्लिकेशनपेक्षा हे खूप भन्नाट आहे. तर एका यूजरने लहान मुलांच्या मीम्सच्या भाषेत "चाड बॉयस इन द मेकिंग" असे लिहिलं लिहिलं आहे.
एका युजरने लिहिले की, वेगळे बसण्याचे कारण अतिशय वैध आहे. कुणालाही त्यांच्या पुस्तकात केस नको आहेत. मलाही माझ्या शाळेच्या दिवसात मुलींच्या केसांचा खूप त्रास व्हायचा. या पोस्टने जुन्या दिवसांची आठवण करून दिली.
एकाने लिहिले की मला आश्चर्य वाटते की त्या मुलांनी हे आपापसात कसे शेअर केले असेल आणि मग ज्याचे इंग्रजी चांगले असेल त्याला लिहायला सांगितले असेल. कारण जर पत्र प्रिन्सिपल मॅडमकडे जायचे असेल तर कोणत्याही चुकीला वाव नसावा.