बिअर शॉपमधून मुलाला बिअर खेरदी करताना वडिलांनी काढली चप्पल, पुढं जे घडलं ते VIDEO मध्ये पाहा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बिअर शॉपमधून मुलाला बिअर खेरदी करताना वडिलांनी काढली चप्पल, पुढं जे घडलं ते VIDEO मध्ये पाहा

बिअर शॉपमधून मुलाला बिअर खेरदी करताना वडिलांनी काढली चप्पल, पुढं जे घडलं ते VIDEO मध्ये पाहा

Jun 07, 2024 04:25 PM IST

Viral Video : वडील आपल्या तरुण मुलाला चप्पलेने मारत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुलगा बिअर खरेदी करण्यासाठी बिअर शॉपमध्ये गेला होता. तेथे बिअर खरेदी करताना त्याच्या वडिलांनी त्याला रंगेहात पकडले.

बिअर खरेदी करताना वडिलांनी रंगेहात पकडले नंतर मुलाला चप्पलेने बदडले.
बिअर खरेदी करताना वडिलांनी रंगेहात पकडले नंतर मुलाला चप्पलेने बदडले.

father son viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वडील आपल्या तरुण मुलाला चप्पलेने मारत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुलगा बिअर खरेदी करण्यासाठी बिअर शॉपमध्ये गेला होता. तेथे बिअर खरेदी करताना त्याच्या वडिलांनी त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर जे झालं ते पाहूनसोशल मीडिया यूजर्स देशी वडील व मुलामधील बॉन्डिंगचे कौतुक करत आहेत.

हा व्हिडिओ इंस्टाग्राम हँडल @peddlermedia वरून १ जून रोजी पोस्ट केला होता. हा व्हिडिओ आतापर्यंत ८३ लाखाहून अधिक हव्यूज मिळाले आहेत. या क्लिपला पोस्ट करताना याला कॅप्शन दिले आहे की, हरियाणवी वडिलांनी मुलाला बिअर खरेदी करताना पकडण्यात आले. त्यानंतर बिअर शॉपच्या समोरच वडिलांनी मुलाची चपलेने धुलाई केली.

व्हायरल क्लिपमध्ये दिसते की, एक पिता दारूच्या दुकानासमोरच मुलाला चप्पलेने मारत आहे. मुलाच्या हातात बिअरची बाटली असून तो म्हणत आहे की, पापा हे माझे नाही, मी बिअर पीत नाही. मात्र वडील त्याचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत व त्याला चप्पलेने मारत असतात. त्यानंतर मुलगा म्हणतो की, पापा ही बाटली माझी नाही शपथ, मित्रांनी मागवली होती. मला का मारत आहात.. सर्वजण पाहात आहेत, मी पीत नाही.

ही क्लिप पाहिल्यानंतर शेकडो यूजर्स यावर कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, सलाम या बाप-लेकाला. दुसऱ्या युजर्सने म्हटले की, हाच असतो देशी बाप लेकाचा बॉन्ड. अन्य एका व्यक्तीने विचारले आहे की, पापा दारूच्या दुकानात काय करत होते.

कंगना रनौतला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर आहे कोण? -

पस्तीस वर्षीय कुलविंदर कौर (kulwinder kaur) या २००९ मध्ये सीआयएसएफमध्ये रुजू झाली. २०२१ पासून कुलविंदर कौर ही चंदीगड विमानतळावर सुरक्षा दलासोबत काम करत आहेत. ती पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे तिचा नवराही सीआयएसएफमध्ये शिपाई आहे. दोघेही एकाच विमानतळावर तैनात असून त्यांना दोन मुलेही आहेत. तसेच, त्यांचे भाऊ शेर सिंग हे शेतकरी नेते आणि किसान मजदूर संघर्ष समितीचे संघटक सचिव आहेत.

दिल्लीला पोहोचल्यानंतर कंगनाने ट्विटरवर पोस्ट करत 'पंजाबमध्ये दहशत आणि हिंसाचारात वाढ झाल्याचे म्हणत तेथे जाण्यास असुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर