Elon Musk : अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पैशांच्या बाबतीत त्याच्या जवळ देखील कुणी पोहोचू शकत नाही. पण एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते. अलीकडेच त्यांच्या आईने एलन मस्कचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये तरुण मस्क ब्लॅक सूट आणि पांढरा शर्ट आणि टायमध्ये दिसत आहे. हा फोटो १९९० च्या दशकातील आहे जेव्हा मस्क हे टोरंटोमधील एका बँकेत काम करत होते.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर करतत्यांची आई मये यांनी लिहिलं की, हा फोटो टोरंटोमधील आमच्या भाड्याच्या घरातील आहे. मागच्या भिंतीवर माझ्या आईचा फोटो आहे. त्यावेळी आम्ही हा ड्रेस जवळपास ९९ डॉलरमध्ये भाड्याने घेतला होता. या सूटसोबतच आम्हाला शर्ट, टाय आणि मोजे मोफत मिळाले. त्यावेळी एलॉन हा एका बँकेत काम करत होता आणि तेव्हाही त्याच्याकडे एकच सूट होता, असे त्याने सांगितले. आम्ही नवीन सूट विकत घेऊ शकत नव्हतो म्हणून तो रोज तोच सूट त्याच्या कामाला जातांना घालायचा.
मस्क यांचे कुटुंब मूळचे दक्षिण आफ्रिकेचे आहे. अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी ते कॅनडात राहत होते. मस्क यांची आई मे यांनी आपल्या 'अ वुमन मेक अ प्लॅन- अॅडव्हाइस फॉर लाइफ लाइफ अॅडव्हेंचर' या पुस्तकात आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आणि त्यांना पुढे नेण्यासाठी किती काम केले याचा खुलासा केला आहे. याशिवाय सेकंड हँड कपडे घालण्याचा संघर्षही त्यांनी या पुस्तकात कथन केला आहे.
आपल्या मुलांना बाहेर नेऊन खाऊ घालणेही कसे शक्य नव्हते, याचे वर्णन मे यांनी केले. या पुस्तकात मस्क यांना कधी कधी फक्त बटर आणि सँडविच खायला घालायच्या. "माझ्या मुलांना ते आवडायचे, त्यांना माहित नव्हते की ते जे खात आहेत त्याच गोष्टी त्यांना परवडणाऱ्या आहेत. कारण त्यांना दुसरे काही खाणे परवडत नव्हते.