सिंगापूर एअरलाइन्सच्या अमेरिकेहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एका ७३ वर्षीय व्यक्तीने चार महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वृद्ध व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बाला सुब्रमण्यम रमेश नावाच्या व्यक्तीला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
द स्ट्रेट्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बाला सुब्रमण्यम रमेशने पीडितांपैकी एका महिलेला सलग चार वेळा शिवीगाळ केली आणि इतर तीन महिलांचाही विनयभंग केला. चार महिलांच्या तक्रारीवरून बाला सुब्रमण्यम रमेशविरोधात एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना १८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात घडली. पहाटे सव्वातीन ते पाच वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान आरोपीने महिलांचा विनयभंग केला. आरोपीने पहाटे सव्वातीनच्या सुमारास पीडित पैकी एका महिलेचा विनयभंग केला आणि त्यानंतर इतर तीन महिलांचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाला सुब्रमण्यम यांनी पहाटे साडेतीन ते सकाळी सहा वाजताच्यादरम्यान दुसऱ्या महिलेचा आणखी तीन वेळा विनयभंग केला. यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याने तिसऱ्या महिलेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर काही तासांनी त्याने चौथ्या महिलेशी गैरवर्तन केले. या महिला सिंगापूर एअरलाइन्सच्या एअर होस्टेस होत्या की प्रवास करत होत्या? हे अद्याप समजू शकलेले नाही.
महिलांनी याबाबत तक्रार केल्यानंतरच बाला सुब्रमण्यम याला विमानतळावर अटक करण्यात आली. सिंगापूरच्या जिल्हा न्यायालयाने त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा निकाल १३ डिसेंबरला दिला जाणार आहे. सिंगापूरच्या कायद्यानुसार छेडछाडीच्या आरोपात दोषी आढळल्यास प्रत्येक प्रकरणात तीन वर्षांचा तुरुंगवास तसेच दंड होऊ शकतो. बाला सुब्रमण्यम यांचे वय पाहता त्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार नाही.
संबंधित बातम्या