Viral News : वीर्य विकून महिन्याला करतोय ५ लाखांची कमाई, किंमत आहे २३ कोटी; हरियाणाच्या अनमोलने मालकाला केले मालामाल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : वीर्य विकून महिन्याला करतोय ५ लाखांची कमाई, किंमत आहे २३ कोटी; हरियाणाच्या अनमोलने मालकाला केले मालामाल

Viral News : वीर्य विकून महिन्याला करतोय ५ लाखांची कमाई, किंमत आहे २३ कोटी; हरियाणाच्या अनमोलने मालकाला केले मालामाल

Nov 16, 2024 10:18 AM IST

viral news : अनमोल नामक एका रेड्याने त्याच्या मालकाला मालामाल केले आहे. अनमोलचे वीर्य विकून तब्बल ५ लाखांची कमाई महिन्याला केली जात आहे.

वीर्य विकून महिन्याला करतोय ५ लाखांची कमाई, किंमत आहे २३ कोटी; हरियाणाच्या अनमोलने मालकाला केले मालामाल
वीर्य विकून महिन्याला करतोय ५ लाखांची कमाई, किंमत आहे २३ कोटी; हरियाणाच्या अनमोलने मालकाला केले मालामाल

Viral News : हरयाणातील सिरसा जिल्ह्यात एक विलक्षण रेडा असून त्याचे नाव अनमोल आहे. नावाप्रमाणेच हा रेडा त्याच्या मालकासाठी अनमोल असून सध्या हा रेडा सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.  या रेड्याचे वजन तब्बल १५०० किलो असून त्याच्या  आलिशान जीवनशैलीमुळे हा रेडा चर्चेचा विषय ठरला आहे. अनमोलची किंमत २३ कोटी रुपये आहे. हा रेडा केवळ त्याच्या  आकारासाठीच नाही तर त्याच्या  लक्झरी लाईफस्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. पुष्कर जत्रेत त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले असून  मेरठच्या अखिल भारतीय शेतकरी मेळाव्यातही अनमोने बाजी मारली आहे. त्याचे वीर्य विकून महिन्याला पाच लाख रुपयांची कमाई अनमोलचा मालक करत आहे.  

अनमोलचे खरे वैशिष्ट्य त्याच्या किमतीत दडलेले आहे. अनमोल त्याच्या विशिष्ट जातीसाठी प्रसिद्ध असून त्याच्या वीर्याला मोठी मागणी आहे.  अनमोलची किंमत २३ कोटी रुपये आहे. ही किंमत दोन रोल्स रॉयस कार किंवा दहा मर्सिडीज बेंझ कारइतकी आहे. तर त्याच्या वीर्य विक्रीतून दरमहा ५ लाखांची कमाई केली जाते. 

शाही जीवनशैली

या रेड्याची जीवनशैली एका महाराजा प्रमाणे आहे. शाही जीवनशैलीसाठी हा रेडा प्रसिद्ध आहे.  आठ वर्षांची या रेड्याची विशेष काळजी घेतली जाते. त्याचा आहार देखील  एखाद्या राजापेक्षा कमी नाही. अनमोलच्या रोजच्या आहारावर १५०० रुपये खर्च होतो. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अनमोल दररोज २५०  ग्रॅम बदाम, ४ किलो डाळिंब, ३० केळी, ५ लिटर दूध आणि २० अंडी खातो. याशिवाय अनमोलला ऑइल केक, हिरवा चारा, तूप, सोयाबीन आणि मका देखील खायला दिले जाते जाते. अनमोलला दिवसातून दोनदा आलिशान अंघोळ घातली जाते. त्याला बदाम आणि मोहरीच्या तेलाने मसाज दिला  जातो. अनमोलची आईही खास असून ती  दिवसाला २५ लिटर दूध देत असे.

अनमोलने मालकाला केले मालामाल  

अनमोलचे वीर्य विकून त्याचा मालक लखपती झाला आहे.  त्याचे आठवड्यातून दोनदा वीर्य काढले जाते. त्याच्या एका विर्याची किंमत २५० रुपये आहे. या वीर्याचा उपयोग शेकडो गुरांच्या प्रजननासाठी केला जातो. अनमोलचे मालक गिल या व्यवसायातून दरमहा सुमारे पाच लाख रुपये कमवत आहे.

गिल अनमोलचा खूप आदर करतात तर त्याची काळजी एका मुलाप्रमाणे घेतली जाते.  त्यांच्यासाठी अनमोल हा केवळ रेडा नसून कुटुंबाचा एक भाग आहे. गिल यांचा असा विश्वास आहे की अनमोल त्याच्यासाठी एक मौल्यवान मित्र आणि असून  जो समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर