Viral News: झोपेतच एका व्यक्तीनं गिळला स्वत:चा दात, काही दिवसानंतर असं घडलं की...
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: झोपेतच एका व्यक्तीनं गिळला स्वत:चा दात, काही दिवसानंतर असं घडलं की...

Viral News: झोपेतच एका व्यक्तीनं गिळला स्वत:चा दात, काही दिवसानंतर असं घडलं की...

Dec 16, 2024 04:39 PM IST

Man swallowed Tooth: एका व्यक्तीने झोपेतच स्वत:चा दात गिळल्याची घटना उघडकीस आली.

Viral News: झोपेतच एका व्यक्तीनं गिळला स्वत:चा दात, काही दिवसानंतर असं घडलं की...
Viral News: झोपेतच एका व्यक्तीनं गिळला स्वत:चा दात, काही दिवसानंतर असं घडलं की...

Viral Video: सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत धक्कादायक उघडकीस आली. एका व्यक्तीने झोपेतच आपला दात गिळला. मात्र, त्यानंतर त्याला अशा समस्यांना तोंड द्यावे लागले, ज्याची त्याने कधीच कल्पना केली नसेल. ही घटना विशाखापट्टणममध्ये घडली, जिथे एका ५२ व्यक्तीने खोट्या दातांची कवळी लावली होती. मात्र, काही दिवसांआधी या कवळीतील एक दात चुकून त्याचा पोटात गेला. त्यावेळी त्याला कुठलाही त्रास झाला नाही. मात्र, काही दिवसानंतर त्याला इतका त्रास झाला की, त्याला डॉक्टरांकडे जावे लागले. तेव्हा त्याच्या फुप्फुसात दात अडकल्याची बाब समजली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला अँकर सांगत आहे की, विशाखापट्टणममधील एका व्यक्तीने स्वतःचा दात कसा गिळला. संबंदित व्यक्ती कृत्रिम कवळीचा उपयोग करत असल्याचे समजले. एकदा तो झोपेत असताना त्याला काहीतरी गिळल्यासारखे वाटले. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसानंतर त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने तो डॉक्टरांकडे गेला,जिथे त्याचा दात तुटून फुफ्फुसात शिरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर संबंधित व्यक्तीला शस्त्रक्रिया करून दात काढावा लागला. मात्र, तोपर्यंत त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

हा व्हिडिओ पल्लवी झा हिने फेसबूकवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत खूप लोकांनी पाहिले आहे. तर, बऱ्याच लोकांनी या व्हिडिओवर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, काही जणांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून भविष्यात अशा होणाऱ्या घटना टाळण्यासाठी योग्य ती खरबदारी घ्यावी, असा सल्ला दिला. पंरतु, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप समजू शकेलेले नाही.

दात किडण्यापासून वाचवतील नैसर्गिक हर्बल टिप्स

तोंडी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने अनेकदा दात किडणे, दात पिवळे पडणे आणि पोकळीशी संबंधित समस्या उद्भवतात. अनेकवेळा खाण्यापिण्यामुळे दातांवर बॅक्टेरिया तयार होतात. ज्यामुळे दात किडतात. तज्ज्ञांच्या मते, लवंग खाल्ल्यानंतर लवंग चावून खाल्ल्याने बॅक्टेरिया आणि वेदनांपासून आराम मिळतो. लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करतात. लवंग चघळल्याने तोंडात आणि घशात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे तोंडाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. याशिवाय, दररोज एक ते दोन पेरूची पाने चावून खाल्ल्याने दातांचे संसर्गापासून संरक्षण होते. पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात, जे तोंडात असलेल्या हानिकारक जीवाणूंशी लढतात. या पानांमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म दातांचे इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. पेरूची पाने चघळल्याने पोकळी रोखण्यास आणि हिरड्यांची जळजळ शांत होण्यास मदत होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर