Delhi Groom Dance News: स्वत:च्या लग्नात बॉलिवूडमधील 'चोली के पीछे क्या है' या लोकप्रिय गाण्यावर डान्सवर करणे नवरदेवाच्या अंगलट आले. नवरदेवाने आपल्या मित्रासोबत केलेला डान्स वधूच्या वडिलांना आवडला नाही, त्यांना नवऱ्या मुलाबाबत भलताच संशय आला आणि त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. या घटनेची सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे.
ही घटना १८ जानेवारी २०२५ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भव्य मिरवणुकीसह स्वत:च्या लग्नात पोहोचलेल्या नवरदेवाला त्याच्या मित्रांनी त्यांच्यासोबत डान्स करण्याचा आग्रह केला. तितक्यात चोली की चोली के पीछे क्या है, हे गाणे वाजू लागले. नवरदेवालाही बॉलिवूडच्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही आणि तोही मित्रांसह डान्स करू लागला. लग्नात सामील झालेल्या पाहुण्यांनी या क्षणाचा आनंद लुटला. पण वधूच्या वडिलांना नवऱ्या मुलाने केलेला डान्स आवडला नाही. नवऱ्या मुलाचा डान्स पमानास्पद आणि आपल्या कुटुंबाच्या परंपरेचा आणि मूल्यांचा अपमान असल्याचा आरोप वधूच्या वडिलांनी केला आणि थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
नवऱ्याने वधूच्या वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, हा एक मजेचा आहे. तर, वधूला अश्रू अनावर झाले. परंतु, वडील आपल्या निर्णयावर ठाम आणि ठाम दिसत होते. व्हायरल झालेल्या बातमीच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी नवरदेव 'चोली के पीचे'वर डान्स करतो. परंतु, नवरदेवाचा डान्स पाहून वधूच्या वडिलांनी लग्न मोडले.
महत्त्वाचे: इतर व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या लग्नाची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. या पोस्टवर भाष्य करताना एका युजरने लिहिले आहे की, ‘बरे झाले वधूच्या वडिलांनी लग्न मोडले, नाहीतर त्यांना दररोज हा डान्स पाहावा लागला असता.’ दुसऱ्या युजरने म्हले आहे. ‘अरेंज मॅरेज म्हणजे एखाद्या सरप्राइजपेक्षा कमी नसते. तुम्हाला काय मिळेल, याची काहीच अपेक्षा नसते.’ तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘हा अरेंज मॅरेज नव्हता, एलिमिनेशन राऊंड होता.’ चौथ्या युजरने म्हटले की, ‘माझ्याही लग्नात चोली की पीछे क्या है, हे वाजल्यानंतर मी देखील डान्स करेल.’ पाचव्या युजरने म्हटले आहे की, ‘नवरदेवाने केलेला सर्व सराव वाया गेला.’
संबंधित बातम्या