Viral Video : बाप रे ! झाडावर लपला होता किंग कोब्रा! दिसताच लोकांना फुटला घाम; पुढं जे झालं ते धक्कादायक...वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : बाप रे ! झाडावर लपला होता किंग कोब्रा! दिसताच लोकांना फुटला घाम; पुढं जे झालं ते धक्कादायक...वाचा

Viral Video : बाप रे ! झाडावर लपला होता किंग कोब्रा! दिसताच लोकांना फुटला घाम; पुढं जे झालं ते धक्कादायक...वाचा

Jul 23, 2024 12:42 PM IST

Cobra Viral Video: सोशल मिडियावर एका झाडावर लपलेल्या किंग कोब्राचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओतील कोब्रा एवढा मोठा आहे की जो कोणी पाहिल त्याची घाबरगुंडी उडेल. या सापाची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी गर्दी केली होती.

झाडावर लपला होता किंग कोब्रा! दिसताच लोकांना फुटला घाम; पुढं जे झालं ते धक्कादायक...वाचा
झाडावर लपला होता किंग कोब्रा! दिसताच लोकांना फुटला घाम; पुढं जे झालं ते धक्कादायक...वाचा

Cobra Viral Video: सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ भन्नाट असतात. काही व्हिडिओमुळे गंमत होते तर काही व्हिडिओ अंगावर काटा आणणणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत झाडावर लपलेला एक किंग कोब्रा लपलेला असून त्याला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे. झाडात लपलेल्या या नागाची लांबी १२ फूट होती. यानंतर रेस्क्यू टीमने येऊन सापाला झाडातून बाहेर काढले आणि जंगलात सुरक्षित स्थळी सोडून दिले.

हा व्हिडिओ दक्षिण कर्नाटकातील पश्चिम घाटातील अगुंबे घाट येथील आहे. वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ एक्स अकाउंटवर शेअर केला असून लाखो नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून त्यावर कमेन्ट दिली आहे. या नागाला रेस्क्यू पथकाने शिताफीने पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडून दिले आहे.

या व्हिडिओच्या सुरुवातीला झाडावर एक लांब किंग कोब्रा लपून बसला असल्याचं दिसत आहे. या सापाला पाहून अनेक नागरिक हे घाबरलेले दिसले असून ते लांब अंतरावरुन या सापाला पाहत असल्याचं दिसत आहे. ही घटना वनविभागाला दिल्यावर रेस्क्यू पथकाचे लोक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने सापाला झाडावरुन खाली काढण्याचा प्रयत्न केला असता, सापाने फना काढून फिस्कारु लागला. यानंतर, पथकाने साप पकडणाऱ्या काठीच्या मदतीने अलगत सापला झाडावरून बाहेर काढले व एका पिशवीत सुरक्षितपणे भरले.

व्हिडिओतील कोब्रा एवढा मोठा आहे की जो कोणी पाहिल तो घाबरून बेजार होईल. सापाला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. सापाला वाचवण्यासाठी राबवण्यात आलेले बचावकार्य पाहण्यासाठी अनेक लोक तेथे जमले होते. कोब्राला सुरक्षित पकडल्यावर या कोब्राला जंगलात सोडण्यात आले. हा व्हिडिओ आतापर्यंत ८ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. आतापर्यंत सुमारे दीड हजार लोकांनी हा व्हिडिओ रीपोस्ट केला आहे, तर १८० हून अधिक वापरकर्त्यांनी कमेंट केल्या आहेत.

एका वापरकर्त्याने हा कोब्रा अतिशय सुंदर आहे, पण भीतीदायकही आहे, अशी कमेंट केली आहे. एकाने लिहिले की, किंग कोब्रा म्हणत आहे की मला धोका नाही, पण मीच धोक्यात आहे. एका यूजरने म्हटले, 'भाऊ, स्वत:ला वाचव. त्यामुळे मला किंग कोब्रा म्हणतात अशा कमेन्ट करण्यात आल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर