Viral News : ड्युटीवर असताना झोपी गेला! जेवणाच्या भांड्यात लघवी केली! संतापलेल्या पोलिसांनी श्वानाचा बोनस रोखला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : ड्युटीवर असताना झोपी गेला! जेवणाच्या भांड्यात लघवी केली! संतापलेल्या पोलिसांनी श्वानाचा बोनस रोखला

Viral News : ड्युटीवर असताना झोपी गेला! जेवणाच्या भांड्यात लघवी केली! संतापलेल्या पोलिसांनी श्वानाचा बोनस रोखला

Jan 29, 2025 09:48 AM IST

Viral News : चीनच्या सोशल मीडियावर फुजाईबाबत बरीच चर्चा सुरू आहे. इंटरनेटवरही त्याचे मोठे फॉलोअर्स देखील आहेत. फुजाई ड्यूटीदरम्यान झोपल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. ही कारवाई व्हायरल झाली आहे.

ड्युटीवर असताना झोपी गेला! जेवणाच्या भांड्यात लघवी केली! संतापलेल्या पोलिसांनी श्वानाचा बोनस रोखला
ड्युटीवर असताना झोपी गेला! जेवणाच्या भांड्यात लघवी केली! संतापलेल्या पोलिसांनी श्वानाचा बोनस रोखला

Viral News : चायना पोलिसांसाठी काम करणाऱ्या एका श्वानाबाबत धक्कादायक बातमी पुढे आली आहे. ही बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. तसेच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.  साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांचा श्वान हा त्याच्या ड्यूटीदरम्यान झोपलेल्या अवस्थेत आढळला. एवढेच नाही तर त्याने त्याच्या जेवणाच्या भांड्यात लघवी देखील होती. त्याच्या या कृत्यामुळे पोलिस प्रशासनाने त्याचा बोनस रोखला आहे. 

 फुजाई असे कारवाई करण्यात आलेल्या श्वानाचे नाव आहे. हा श्वान चीनमध्ये फेमस आहे. त्याचे सोशल मिडियावर मोठे फॉलोअर्स देखील आहेत. त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याचा वर्षाच्या अखेरीस  मिळणारा बोनस रोखला जाणार आहे.  फुझाईला तात्काळ उत्तर चीनच्या शेडोंग प्रांतातील वेईफांग येथील पोलिस श्वान प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले आहे. जानेवारी २०२४ मध्ये चार महिन्यांच्या फुझाईला डॉग स्कॉडमध्ये  स्फोटके शोधण्यासाठी नेमण्यात आले होते. तसेच त्याला प्रशिक्षित देखील करण्यात आले होते.  

चीनच्या सोशल मीडियावर फुजाईवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत मोठी चर्चा सुरू आहे. इंटरनेटवरही त्याच्यावर करण्यात आलेली कारवाई व्हायरल झाली आहे. वेफांग पब्लिक सिक्युरिटी ब्युरोने फुजाईवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती सोशल मीडियावर दिली.  कोर्गी पोलीस डॉगचे फुजाई आणि त्याचे कॉम्रेड्स नावाचे अकाऊंट असून त्याचे तब्बल ३ लाख ८४ हजार पेक्षा जास्त  फॉलोअर्स आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्लिपमध्ये फुजाईचा परफॉर्मन्स रिव्ह्यू देण्यात आला होता. यात त्याच्यावर कारवाई का केली जात आहे, हे स्पष्ट करण्यात आले होते.  

फुझाईचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. यातील तो एका  पोलिस अधिकाऱ्यासमोर बसून त्याला  लाल फुले, डबाबंद स्नॅक्स आणि खेळणी भेट देतो. दरम्यान, फुझाई हा त्याच्या ड्यूटीवर असतांना झोपल्याने त्याच्यावर कारवाई करत त्याला देण्यात आलेले  बक्षीस काढून घेण्यात आले. या कारवाईवर नेटकऱ्यांनी  सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. त्याच्या बाबत अनेक चर्चा देखील रंगल्या. फुझाई यांना त्यांच्या निष्काळजीपणाची व  कृतीची शिक्षा झाल्याबद्दल काही लोकांनी आनंद व्यक्त केला. तर काही जणांनी फुझाईबाबत  सहानुभूती देखील दाखवली आहे. फुझाईची प्रकृती ठीक नसावी त्यामुळे तो झोपला असावा असे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर