Viral News : पत्नीचं लफडं शोधण्यासाठी पतीनं घेतली ड्रोनची मदत! बॉससोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : पत्नीचं लफडं शोधण्यासाठी पतीनं घेतली ड्रोनची मदत! बॉससोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं

Viral News : पत्नीचं लफडं शोधण्यासाठी पतीनं घेतली ड्रोनची मदत! बॉससोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं

Published Jul 15, 2024 03:33 PM IST

Viral News : चीनमधील एका महिलेचे विवाह बाह्य संबंध सुरू होते. याची कुणकुण ही पतीला लागली. त्याने पत्नीला रंगेहात पकडण्यासाठी थेट ड्रोनची मदत घेतली. ही बातमी सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली असून यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पत्नीचं लफड शोधण्यासाठी पतीनं घेतली ड्रोनची मदत! बॉससोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं
पत्नीचं लफड शोधण्यासाठी पतीनं घेतली ड्रोनची मदत! बॉससोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं

Viral News : पत्नी पतीचं नातं हे अतूट असतं. हे नातं विश्वासाच्या जोरावर टिकलेलं असतं. चीनमध्ये एक जोडपं एकमेकांवर मनापासून प्रेम करत संसाराचा गाडा हाकत होतं. मात्र, त्यांच्या या संसराला विवाह बाह्य संबंधांचे ग्रहण लागले. पत्नी ही पतीला न कळत धोका देत होती. तिचे तिच्या बॉस सोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे तिच्या वागणुकीत झालेले बदल पतीला दिसले. तिला रंगेहात पकडण्यासाठी पतीने अविश्वासू पत्नीला तंत्रज्ञानाच्या मदतीने रंगेहात पकडले. या घटनेची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया यावर दिल्या आहेत.

चीनच्या हुबेई प्रांतात ही घटना घडली आहे. ३३ वर्षीय जिंगला त्याच्या पत्नीच्या वागणुकीत बदल झाल्याचे आढळले. गेल्या वर्षभरापासून ती त्याच्याशी नीट वागत नसल्याने जिंगला तिच्यावर संशय आला. पत्नीचं बाहेर काही तरी लफडं सुरू असल्याने त्याला तिला रंगेहात पकडायचे होते. रिपोर्ट्सनुसार, पत्नी तिचे बिंग फुटू नये यासाठी तिचा जास्तीत जास्त वेळ घरात घालवत होती. मात्र, जिंगने पत्नीला रंगेहात पकडण्यासाठी तिच्यावर ड्रोनद्वारे पाळत ठेवली. ती बाहेर जाताच अथवा घरात एकटी असतांना ड्रोन हा तिच्या नकळत तिच्यावर नजर ठेऊन होता. अखेर या ड्रोने सत्य उघड केले.

बायकोला बॉससोबत रंगेहात पकडले

जिंग आणि त्याची पत्नी दोघेही काम करतात. पत्नी एका व्यक्तीच्या कारमध्ये बसून डोंगराच्या दिशेने गेल्याचे ड्रोनमध्ये दिसले. यानंतर पत्नी व तिचा बॉस हातात हात घेऊन कार मधून बाहेर पडले आणि जवळच्या झोपडीत गेले. तब्बल २० मिनिटांनी दोघेही बाहेर आलेत. आणि त्यानंतर त्यांच्या कारखान्याकडे दोघेही निघून गेलेत.

घटस्फोटाची केस दाखल केली

पत्नी धोका देत असल्याचे समजल्याने जिंगला मोठा धक्का बसला. त्याने लगेच तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. जिंगच्या म्हणण्यानुसार, त्याने त्याच्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. करण, त्याच्या कडे पत्नीविरोधात भक्कम पुरावे आहेत. ज्यामुळे त्याला घटस्फोट सहज मिळण्यास मदत होईल. झिंग म्हणाला की, गेल्या एक वर्षापासून पत्नीच्या वागणुकीमुळे तो त्रस्त होता ती त्याच्याशी भांडणे उकरून काढायची. पूर्वी ती त्याच्याकडे खूप लक्ष द्यायची. पण नंतर अचानक तिच्या वर्तनात मोठा बदल झाला. मात्र, त्यानंतर ती जिंगला माहेरी जाण्याचे कारण सांगत एकटी निघून जायची, त्यामुळे जिंगचा संशय बाळवला होता. व त्याने सत्य उघड करण्यासाठी पत्नीवर ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवायला सुरूवाट केली. आणि सत्य उघड झाले.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतीक्रिया

झिंगची ही स्टोरी सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की ड्रोन खरेदी करण्याची कल्पना सर्वोत्तम होती. आणखी एका युजरने लिहिले की, हे तंत्रज्ञानाचे युग आहे जिथे कोणीही खोटे बोलून पळून जाऊ शकत नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर