China rocket falls Viral video : चीनने अंतराळातील गामा-किरणांचा अभ्यास करण्यासतही फ्रांसच्या मदतीने एक यान प्रक्षेपित केलं. या यानाचे प्रक्षेपण यशस्वी झाले. शनिवारी अवकाशात पाठवण्यात आलेला या उपग्रहावर चीन आणि फ्रान्सच्या शास्त्रज्ञ सुमारे २० वर्षांपासून मेहनत घेत होते. दोन्ही देशांनी संयुक्तपणे प्रक्षेपित केलेल्या या उपग्रहाचा काही भाग मात्र, प्रक्षेपण केल्यावर चीनमध्येच काही निवासी वसाहतींवर पडला. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊन नागरिक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळू लागले होते. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
व्हिडिओत यानाचा एक भाग आकाशातून खाली कोसळताना दिसत आहे. तर नागरिक देखील जिवाच्या भीतीने पळतांना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे, चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांची मोहीम यशस्वी झाली असून हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थापित झाले आहे.
शनिवारी, चीन आणि फ्रान्सने संयुक्तपणे प्रक्षेपित केलेला उपग्रह घेऊन गेलेल्या लाँग मार्च २-सी रॉकेटचा स्फोट झाला. त्याचा काही भाग पृथ्वीवरील निवासी भागावर पडला. त्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. काही काळ लोकांना असे वाटले की आकाशातून पृथ्वीवर काहीतरी पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पेस व्हेरिएबल ऑब्जेक्ट मॉनिटर (SVOM) नावाच्या उपग्रहासह अंतराळ यानाने चीनच्या २२ केंद्रातून उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच रॉकेटचा एक भाग पृथ्वीवर पडला. रॉकेटचा जो भाग पृथ्वीवर पडला त्याला बूस्टर म्हणतात.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रॉकेट लोकवस्तीच्या परिसरात पडताना दिसत आहे. रॉकेटचा काही भाग घरावर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आणि ते जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, हा उपग्रह, एक स्पेस-आधारित मल्टी-बँड व्हेरिएबल ऑब्जेक्ट मॉनिटर (SVOM) लाँग मार्च-२ सी रॉकेटद्वारे दक्षिण-पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला.
चीन आणि फ्रांसने अवकाशात पाठवलेला हा उपग्रह आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली उपग्रह आहे आणि यशस्वीरित्या त्याच्या कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. या बाबत माहिती देतांना चिनी अधिकाऱ्यांनी मोहीम यशस्वी झाल्याचे सांगितले. चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, गॅमा-किरणांच्या स्फोटांसह खगोलीय घटनांचा अभ्यास करणे हे उपग्रहाचे उद्दिष्ट आहे. चीन आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे विकसित केलेला हा पहिला खगोलशास्त्रीय उपग्रह आहे, जो अंतराळ आणि चंद्राच्या शोधात चीनची वाढत्या ताकदीचे प्रदर्शन करते.