Viral News : लग्न म्हटले की अनेक गोष्टी आल्या. यात नातेवाईकांचा मानपान, रुसवे-फुगवे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. यातील काही गोष्टी या मजेशीर असतात. या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ही घटना नवरदेवाच्या मित्रांनी Reddit वर विस्तृतपणे लिहिली आहे. या घटनेनंतर परिस्थिती सावरण्यासाठी त्यांनी काय केले हे देखील त्यात लिहिले आहे. ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत असून लोक त्यावर मजेशीर कमेंट करत आहेत.
वराच्या मित्रांनी लिहिलेल्या पोस्टनुसार, लग्नाचे विधी सुरू झाले होते. लग्नातील पाहुण्यांना जेवायला सांगण्यात आले होते. नातेवाईक भुकेले असल्याने बुफेच्या टेबलवर नातेवाईक अक्षरक्ष: तुटून पडले. बुफेच्या सर्व टेबलवर कणाऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत होती. यावेळी नवरदेवाचे आम्ही मित्र रांगेत उभे राहून जेवण कधी मिळेल याची वाट पाहत होतो. जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा तेव्हा सगळं संपलं होतं. सर्वांनी जे मिळाले ते खाल्ले व परत लग्न मंडपात येऊन बसले.
पण, पोट भरले नसल्याने व भुकेणे व्याकुळ झाल्याने मित्रांनी जेवण ऑर्डर करण्याचे ठरवले. त्यांनी थेट लग्न मंडपाजवळील पिझ्झा जॉइंटमधून चार पिझ्झा आणि काही चिकन विंग्स ऑर्डर केले. नवरदेवाचे मित्र पिझ्झा खात असताना पाहून अनेकांनी त्यांना लग्नात पिझ्झा कुठे मिळाला, अशी विचारणा पाहुणे मंडळी करू लागली. ही बाब उडत उडत वधूपर्यंत पोहोचली. या घटनेमुळे वधू चांगलीच संतापली. तिला राग आला तसेच तिच्या घरच्यांचा अपमान झाल्याची तिची भावना झाली. तिने लग्न मंडपात थेट तमाशा सुरू करण्यास सुरुवात केली. अखेर नवरदेवाने नेमके काय झाले याची माहिती मित्रांना विचारली. यावेळी त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून नवरदेवाने देखील डोक्यावर हात मारून घेतला.
पोस्टनुसार, वराने मित्रांना म्हटले की, जर तुम्हाला जेवायचे असते तर तुम्ही बाहेर जाऊन जेवले असते. लग्नाच्या ठिकाणी पिझ्झा मागवायची काय गरज होती? यानंतर मित्रांचे म्हणणे ऐकून नवरदेवाने डोक्यावर हात मारून घेतले. पोस्टनुसार, मित्रांनी सांगितले की ते खूप दारू प्यायले होते. मद्यधुंद अवस्थेत बाहेर जाऊन खाण्यासाठी हॉटेल शोधणे धोक्याचे होते. यामुळे वराची प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता होती. त्यामुळे या भीतीने आम्ही सर्वांनी भीतीने लग्नमंडपातच पिझ्झा मागवला. मित्रांचे हे उत्तर ऐकून वर काहीही न बोलता वधूची समजूत काढण्यासाठी निघून गेला. जी त्याच्या मित्रांकडे रागाने पाहत होती.
संबंधित बातम्या