Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा प्राणिसंग्रहालयात असल्याचं दिसत आहे. हा मुलगा एका वाघाच्या तिथे पिंजऱ्या जवळ असून पिंजऱ्यातील वाघाने त्या मुलाचा शर्ट तोंडात पकडला आहे. हे दृश्य भयंकर दिसत असून मुलगा वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी वाघाला विनवणी करतांना दिसत आहे. तो मदतीसाठी ओरडत असून यावेळी तो वाघाला त्याचा शर्ट सोडण्याची विनवणी करतांना त्याने शर्ट फाडला तर त्याची आई त्याला मारेल, त्यामुळे प्लीज शर्ट सोड असं म्हणताना तो दिसत आहे. या मुलाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
सोडण्यासाठी थेट वाघालाचं विनंती
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मुलगा खूप ओरडत व रडतांना दिसत आहे. तो वाघाला त्याचा शर्ट सोडण्याची विनवणी करत आहे. शर्ट फाटला तर आई त्याला खूप शिव्या व मार देईल. सोड, प्लीज. असे तो वाघाला म्हणत वारंवार विनवणी करत आहे. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या प्राणीसंग्रहालयातील आहे व तो कधी शूट करण्यात आला आहे, या बाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय हा मुलगा कोण आहे आणि त्याचा शर्ट वाघाने तोंडात कसा पकडला, याची देखील माहिती नाही. शिवाय तेथे असलेले नागरिक त्याला वाघाच्या तावडीतून सोडवण्या एवजी व्हिडिओ काढतांना दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यावर अनेक जण कमेंटही करत आहेत. एका एक्स युजरने लिहिले की, "मुलाची प्रतिक्रिया अनमोल आहे." वाघाने पकडल्यानंतरही त्याची पहिली प्रतिक्रिया माझा शर्ट सोड. आई शिव्या देईल, असून यातून त्याचा निरागस पणा दिसत असल्याचे एका यूझरने म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने कमेंट केली की, टायगरच्या हल्ल्याव मृत्यूच्या भीतीपेक्षा मम्मीची दहशत जास्त आहे. तर व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीवर इतरही काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडिओ बनवणं बंद करून मुलाला मदत करायला हवी होती, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या