Viral news : कामाचा ताण सोडा! एका महिलेने झोपून तब्बल ९ लाख रुपये जिंकले, हे नेमकं कसं घडलं? वाचा-viral news bengaluru women saishwari patil won nine lakhs just by sleeping know about sleep internship ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : कामाचा ताण सोडा! एका महिलेने झोपून तब्बल ९ लाख रुपये जिंकले, हे नेमकं कसं घडलं? वाचा

Viral news : कामाचा ताण सोडा! एका महिलेने झोपून तब्बल ९ लाख रुपये जिंकले, हे नेमकं कसं घडलं? वाचा

Sep 24, 2024 10:05 AM IST

Viral news : स्लीप इंटर्नशिपच्या माध्यमातून एका महिलेने तब्बल ९ लाख रुपये कमावले आहे. स्लीप इंटर्नशिप अशा लोकांसाठी डिझाइन केली आहे ज्यांना पुरेशी विश्रांती घेता येत नाही. यात सहभागींना रोज रात्री ८-९ तास झोपण्याचे टास्क दिले जाते.

कामाचा ताण सोडा! एका महिलेने झोपून तब्बल ९ लाख रुपये जिंकले, हे नेमकं कसं घडलं? वाचा
कामाचा ताण सोडा! एका महिलेने झोपून तब्बल ९ लाख रुपये जिंकले, हे नेमकं कसं घडलं? वाचा

Viral news : कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताण असतो. पैसे कमावण्यासाठी तसेच जॉब टिकवण्यासाठी अनेक जण तहान भूक विसरून कामाला प्राध्यान्य देत असतात. यामुळे अनेकांना आरोग्य विषयक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, तुम्ही अशा इंटर्नशिपबद्दल ऐकले आहे का ? जिथे तुम्हाला झोपण्यासाठी पैसे दिले जातात? तेही लाखो रुपये. होय, तुम्हाचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण ही सत्य घटना आहे.

साईश्वरी पाटील ही बेंगळुरू येथील रहिवासी असून ती व्यवसायाने बँकर आहे. साईश्वरीने एका स्लिप इंटर्नशिपच्या माध्यमातून तब्बल ९ लाख रुपये जिंकले आहेत. यामध्ये तिला सलग काही तास झोपण्याचे काम देण्यात आले होते. या अनोख्या स्लीप इंटर्नशिप कार्यक्रमाचा तिसरा सिझन नुकताच आयोजित करण्यात आला होता. यात साईश्वरी पाटील हिने सर्वाधिक काळ शांत झोपून बक्षीसाची ९ लाखांची रक्कम जिंकली आहे.

स्लीप इंटर्नशिप अशा लोकांसाठी डिझाइन केली आहे, ज्यांना पुरेशी विश्रांती घेता येत नाही. यामध्ये सहभागींना रोज रात्री ८-९ तास झोपण्याचे टास्क दिले जाते. साईश्वरी १२ निवडक स्लीप इंटर्नपैकी एक होती, ज्यांना झोपण्यासाठी आरामदायी गादी देण्यात आली होती. शिवाय, झोपेच्या पद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी स्लीप ट्रॅकर देखील बसवण्यात आले होते. चांगली झोप कशी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्यांना मानोपचार तज्ञांशीही देखील ओळख करून देण्यात आली. या लोकांनी त्यांना त्यांच्या समस्या सांगितल्या आणि पुरेशी झोप कशी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन केले.

साईश्वरी पाटील या इंटर्नशिपबद्दल काय म्हणाली?

या इंटर्नशिपबाबतचे अनुभव साईश्वरी पाटील यांनी सांगितले आहे. या बाबत तिने ‘द हिंदू’शी संवाद साधला आहे. साईश्वरी म्हणाली, शांतझोपेसाठी जागरण आणि झोपण्याच्या वेळेचा सातत्याने मागोवा ठेवावा लागला. याचा रात्री झोपण्यापूर्वी आपण ज्या कृती करतो त्यावर मर्यादा आणाव्या लागल्या. ही खूप आव्हानात्मक होतं. जसे रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि सोशल मीडियापासून लांब राहणे. या सवयी सोडणे फार कठीण झालं, परंतु त्या सवई सोडणे खूप फायदेशीर देखील ठरलं. झोपेची गुणवत्ता सुधारणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे तिने सांगितले. स्पर्धेचा तणाव झोपेवर परिमाण करू शकतो, या बाबत देखील सतर्क राहावे लागले, असे साईश्वरीने सांगितले.

Whats_app_banner