मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vrial News: ऐकावं ते नवलचं! ८० व्या वर्षी वृद्ध व्यक्ती पहिल्यांदा झाला बाप, फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेन्ट

Vrial News: ऐकावं ते नवलचं! ८० व्या वर्षी वृद्ध व्यक्ती पहिल्यांदा झाला बाप, फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेन्ट

Jun 24, 2024 07:03 AM IST

Vrial News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक ८० वर्षांचा वृद्ध व्यक्ति नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाजवळ उभा असल्याचे दिसत आहे. हे त्यांचे पहिले अपत्य असल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हारयल होत आहे.

ऐकावं ते नवलचं! वयाच्या ८० व्या वर्षी वृद्ध व्यक्ती पहिल्यांदाच झाला बाप, फोटो पाहून दिल्या भन्नाट कमेन्ट
ऐकावं ते नवलचं! वयाच्या ८० व्या वर्षी वृद्ध व्यक्ती पहिल्यांदाच झाला बाप, फोटो पाहून दिल्या भन्नाट कमेन्ट

Viral News : मलेशियामध्ये एक वृद्ध व्यक्ति वयाच्या ८० व्या वर्षी पहिल्यांदा बाप झाला आहे. त्याचा त्याच्या नवजात मुलासोबतचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. पाक योब असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून त्याने त्याच्या पहिल्या मुलाचे मुलाचे स्वागत केले. ३१ मे रोजी योबच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. या बाबतचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. मात्र, काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर अनेक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पाक योब हा हॉस्पिटलमध्ये आपल्या नवजात मुलाच्या पाळण्याजवळ उभा असताना अज़ान वाचत आल्याचं दिसत आहे. अनेकांनी पाक योब आणि त्याची ४२ वर्षीय पत्नी उम्मी हिचेही कौतुक करत अभिननंद केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

योब ची पत्नी उम्मीच्या म्हणण्यानुसार, पहिल्या मुलाला जन्म देण्यापूर्वी या जोडप्याने १० वर्षे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. आता त्यांची अपत्याची इच्छा पूर्ण झाली असून हे जोडपे देवाने दिलेली देणगी मानत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जोडप्याच्या वयातील ३८ वर्षांच्या फरकाव्यतिरिक्त, सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्य वाटले की पाक योबच्या पत्नीचे वय जास्त असूनही ती गर्भधारणा कशी करू शकली.

तर काही नेटकऱ्यांना वयाच्या ८० व्या वर्षी पाक योब मुलाचे संगोपन करण्याची आव्हाने येऊ शकतात याची चिंता व्यक्त केली. एका वापरकर्त्याने म्हटले की, "मुलाची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे शक्ति शिल्लक असेल का?" दुसऱ्याने आश्चर्य व्यक्त केले की, "एखादा म्हातारा आपल्या मुलाला मोठं होण्यासाठी अजून किती वर्षे वाट पाहू शकेल ?"

इंटरनेटवरील या कमेन्ट वाचूनही पाक योब आणि उम्मीच्या कथेने मुले जन्माला घालण्यासाठी संघर्ष कसे करतील असा प्रश्न उपस्थित केला आहे. या जोडप्यापासून प्रेरित होऊन एका यूजरने लिहिले आहे की, "मी नुकतीच ४० वर्षांची झालो आहे आणि मला अजूनही मुले नाहीत. कधीकधी मला याबद्दल विचार करून नैराश्य येते. जर या वयात मुले जन्माला आली तर खूप छान आहे. कदाचित आम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. ” अनेकांनी पाक योब आणि उम्मीच्या कथेचे वर्णन प्रेम आणि संयमाची कथा म्हणून केले आहे. दृढ विश्वासामुळे चमत्कार घडू शकतात असा विश्वास अनेकांनी योबच्या फोटोवर कमेन्ट करत व्यक्त केला आहे.

WhatsApp channel
विभाग