Viral News : काळ आला होता पण...!बसस्टॉपवर बसलेल्या तरुणाच्या अंगावर गेली बस, थोडक्यात बचवला, व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : काळ आला होता पण...!बसस्टॉपवर बसलेल्या तरुणाच्या अंगावर गेली बस, थोडक्यात बचवला, व्हिडिओ व्हायरल

Viral News : काळ आला होता पण...!बसस्टॉपवर बसलेल्या तरुणाच्या अंगावर गेली बस, थोडक्यात बचवला, व्हिडिओ व्हायरल

Dec 05, 2024 09:46 AM IST

viral news : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण बसस्टॉपवर बसला असून अचानक त्याचा मृत्यू होतो. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 बसस्टॉपवर बसलेल्या तरुणाला मृत्यूनं गाठलं! धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!
बसस्टॉपवर बसलेल्या तरुणाला मृत्यूनं गाठलं! धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

viral news : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मुळे नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.  व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण बसस्टॉपवर शांत बसलेला दिसत असून काही क्षणात त्याचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे. ही घटना एका चित्रपटाचा कथानकापेक्षा कमी नाही. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक तरुण बस स्टॉपवर बसलेला आहे. तो त्याच्या फोनमध्ये व्यस्त असतांना एक बस रिव्हर्स घेत असतांना बसस्टॉपमध्ये शिरली. काही क्षणात घडलेल्या या घटनेमुळे तरुणाला पळण्याची संधी देखील मिळाली नाही. ही बस थेट तरुणाच्या अंगावर गेली.  खुर्चीवर बसलेला तरूणाच्या अंगावर बस आली. ही घटना बसस्टॉपवरील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने त्याच्या मदतीसाठी धाव घेतली.  बसड्रायव्हरला देखील ही घटना लक्षात आली आणि त्याने बस पुढे घेतली. दरम्यान,  उपस्थित नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यात तरुण किरकोळ जखमी झाला, मात्र मोठ्या अपघातातून तो थोडक्यात बचावला.

हा व्हिडिओ पाहून नागरिकांनी या घटनेला  चमत्कार म्हटलं आहे.  एका युजरने म्हटले आहे की, हा तरुण खरंच नशीबवान आहे. तर एका युजरने तरुणाला, "हा खरा 'स्टील मॅन' म्हटलं आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ७२ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ही घटना केवळ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली नाही, तर आयुष्य कधीकधी अशी वळणे घेते की जे समजणे कठीण असते हे ही पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पाहा व्हायरल व्हिडिओ:

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर