Vrial news : भारतात विविध प्रकारच्या कारचे असंख्य चाहते आहेत. विशेषत: स्पोर्टस कार तर तरुणांच्या आवडीची गोष्ट असते. भारतात अनेक जण कारचे शौकीन आहेत. तर काहींना जुन्या गाड्या मॉडीफाईड करण्याची सवय असते. खुले छत, जोरदार वेग आणि स्टायलिश लूक यामुळे स्पोर्टस कार अनेकांच्या मनाला भावते, मात्र सामान्य कार पेक्षा या कार खूप महाग असल्याने त्या घेणे परवडत नाही. मात्र, एका पठ्ठ्याने चक्क आपल्या नॅनो कारलाच स्पोर्टस कारमध्ये रूपांतरित केले असून, नॅनो कारच्या या नवीन लुक'ची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.
एका व्हायरल सोशल मीडिया व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली मॉडिफाईड नॅनो कार घेऊन रस्त्यावरून जात असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत असून, कारच्या नवीन लूक बाबत सोशल मीडिया युझर्स बरीच चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे .
नॅनो कार तुम्ही आतापर्यंत अनेकदा रस्त्यावर धावताना पाहिली असेल. तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या गाड्याही पाहिल्या असतील. पण सगळ्या नॅनो या एकसारख्या दिसल्या असतील. पण एका व्यक्तीने आपली नॅनो कार मॉडिफाय करून ती खुल्या कारसारखी बनवली. त्याने गाडीचे छत काढले. यासोबतच करची मागील काचही काढण्यात आली असून, वाहनाच्या छताला स्पर्श करणारा दरवाजाचा काही भागही काढण्यात आला आहे. अशा प्रकारे त्याने आपल्या कारमध्ये बदल करून तिला एक अनोखा आणि स्टायलिश लुक दिला आहे. त्यामुळेच केवळ रस्त्यावरच नव्हे, तर आता सोशल मीडियावरदेखील या कारची चर्चा होत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bhilaitrend नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना, 'तुम्हा सर्वांना हा कसा वाटला?', असे कॅप्शन लिहिले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ९८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. जिथे काही लोक कारच्या या नवीन लूक ला पसंती दर्शवित आहेत, तिथेच काही लोक याला नापसंत करत असल्याचेही दिसून आले आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले - ही लॅम्बोरर्गीनी नाही तर नॅनोगिनी आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले - भाऊ, पावसाळ्यात तुम्ही त्यात कोणती ताडपत्री ठेवता? तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले - कार एसी आरआयपी. दुसऱ्या युजरने लिहिले - हे नष्ट झालेल्या नॅनोसारखे दिसते.