Viral News : विमानाच्या दारात उभे राहून काकांनी मळली तंबाखू, मग केले असे की व्हिडिओ झाला व्हायरल-viral news a man ate tambahkhu while standing at the door of the plane ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : विमानाच्या दारात उभे राहून काकांनी मळली तंबाखू, मग केले असे की व्हिडिओ झाला व्हायरल

Viral News : विमानाच्या दारात उभे राहून काकांनी मळली तंबाखू, मग केले असे की व्हिडिओ झाला व्हायरल

Aug 29, 2024 03:26 PM IST

Viral News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस हा विमानाच्या दारात उभा राहून तंबाखू मळतांना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विमानाच्या दारात उभे राहून काकांनी मळली तंबाखू, मग केले असे की व्हिडिओ झाला व्हायरल
विमानाच्या दारात उभे राहून काकांनी मळली तंबाखू, मग केले असे की व्हिडिओ झाला व्हायरल

Viral News : सध्या सोशल मिडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. यातील बहुतांश व्हिडिओ हे मजेशीर असतात तर काही भयानक असतात. सध्या एका काकांचा विमान प्रवासाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. हे काका विमानाच्या दरवाज्यात उभे राहून तंबाखू मळून खतांना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विमान प्रवासाची अनेकांना क्रेझ असते. अनेक नागरिक टापटीप राहून विमान प्रवास करण्यास पसंती देतात. तसेच आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही किंवा आपलं हसू होऊनये यासाठी देखील आपण काळजी घेत असतो. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओत असलेल्या व्यक्तीला याचं काही देणं घेणं नसल्याच दिसतं. या काकांना विमान म्हणजे एसटी महामंडळाची बस वाटली असून ते विमानाच्या दरवाजा जवळ उभे राहून तंबाखू मळतांना व हात झटकून तोंडात टाकतांना दिसत आहेत.

काय आहे व्हायरल व्हिडिओत ?

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एका विमानतळाच्या धावपट्टीवर एक विमान उभे आहे. ही विमान उड्डाण घेण्यास तयार आहे. विमाना शेजारी क्रू मेंबर्स दिसत असून विमानाचे दार प्रवाशांसाठी उघडे आहेत. दरम्यान, विमानाच्या मागील दरवाजावर एक वृद्ध व्यक्ती येतो आणि उभा राहतो. यावेळी तो त्याच्या खिशातून तंबाखूची पुडी काढतो व हातावर तंबाखू चुना टाकून मळण्यास सुरुवात करतात. तंबाखू मळून झाल्यावर ही व्यक्ति त्यातील खराब भाग काढून मळलेला तंबाखू चिमटीत घेऊन तोंडात घालतात. हा व्हिडीओ कोणत्या विमान तळांवरील आहे याची माहिती कळली नाही. मात्र, हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीच्या शेजारी उभे असलेले कर्मचारीही त्याच्या वागण्याने नाराज झालेले दिसतात. सोशल मीडियावर लोकांना या व्यक्तिची ही स्टाइल खूपच आवडली आहे. ही स्टाइल मनोरंजनाचे साधन बनली आहे. २३ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडिओ एक्सवर अनेक लोकांनी पुन्हा पोस्ट केला आहे. या व्हिडिओला सुमारे ४ हजार लोकांनी लाईक केले आहे, तर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेन्ट देखील दिल्या आहेत.

या पोस्टवर अनेकांनी हसणाऱ्या इमोजीसह कमेंट केली आहे. तर अनेकांनी त्यांना फ्लाइटमध्ये चढण्याची परवानगी कशी दिली ? असा प्रश्न उपस्थित केला. दुसऱ्या युजरने म्हटलं की, तो एक लीजंड आहे जो विमानाच्या दारात उभे राहूनही आपली नशा विसरला नाही. तर दुसऱ्या युजरने उपहासात्मकपणे म्हटले की, तो यूपीमधून आल्याचं दिसतं. एका युजरने तिच्यासोबत अशीच एक घटना शेअर केली आणि सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला ती फ्लाइटमध्ये गोव्याला जात होती. तेव्हा फ्लाइटमध्येच तिच्या शेजारी बसलेला एक माणूस रजनीगंधा खात होता. त्याच्या वासाचा आणि वागण्याचा तिरस्कार वाटत असल्याचं तिनं लिहिलं आहे. तर दुसऱ्या युजरने विमान असो वा ऑटो, लोकांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

विभाग