छतावरून अचानक सोफ्यावर पडला तब्बल ८० किलोचा अजगर! पाहताच फुटला घाम; व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  छतावरून अचानक सोफ्यावर पडला तब्बल ८० किलोचा अजगर! पाहताच फुटला घाम; व्हिडिओ व्हायरल

छतावरून अचानक सोफ्यावर पडला तब्बल ८० किलोचा अजगर! पाहताच फुटला घाम; व्हिडिओ व्हायरल

Dec 09, 2024 08:39 AM IST

Python Viral Video: या अजगराची लांबीही सुमारे पाच मीटर होती. दिवाणखान्याच्या छतावर ती रेंगाळत असताना खाली ठेवलेल्या सोफ्यावर पडली. हे पाहताच लोकांची ओरड बाहेर आली.

छतावरून अचानक सोफ्यावर पडला तब्बल ८० किलोचा अजगर! पाहताच फुटला घाम; व्हिडिओ व्हायरल
छतावरून अचानक सोफ्यावर पडला तब्बल ८० किलोचा अजगर! पाहताच फुटला घाम; व्हिडिओ व्हायरल

Python Viral Video : साप आणि अजगर तुम्ही आतापर्यंत अनेकदा पाहिले असतील, पण बहुतेक ते जंगलात किंवा दुर्गम भागातच आढळतात. मार, जर तुमच्या तुमच्या घरात जर अजगर निघाला आणि तोही छोटा मोठा नाही तर तब्बल  ८० किलोचा असेल तर?  विचार करू शकत नाही ना ? मात्र हे घडलं आहे! मलेशियातील कामुंटिंग येथील कंपुंग डू येथे ८० किलो वजनाचा अजगर अचानक छतावरून घरात पडला. अजगराला पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.  त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या अजगराची लांबीही सुमारे पाच मीटर होती. दिवाणखान्याच्या छतावर हा अजगर फिरत असतांना अचानक खाली असलेल्या सोफ्यावर पडला. यावेळी घरातील काही जण दिवाणखान्यात बसले होते. भला मोठा अजगर खाली पडलेला पाहून त्यांची बोबडी वळली. त्यांना घाम फुटला. घरातील काही जणांनी घाबरून घरातून बाहेर पळ काढला. तर काहींनी आरडा ओरडा केला.  न्यू स्ट्रेट्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा अजगर जवळच्या ऑइल पाम च्या बागेतून घरात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेची माहिती  लगेचच कुटुंबीयांनी ताईपिंग जिल्हा नागरी संरक्षण दलाला देत त्यांना मदतीसाठी बोलावले. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

एपीएमचे अधिकारी मोहम्मद युनूस यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी पकडलेला अजगर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अजगर आहे. याची उंची सुमारे पाच मीटर असून वजन ८० किलो आहे. यावरून अजगर कसा दिसत असेल याच अंदाज बांधता येतो. अजगराला पकडण्यासाठी सात जणांच्या पथकाला मोठी कसरत करावी लागली. रात्री आठच्या सुमारास कुटुंबीयांच्या मदतीसाठी बचाव पथक पोहोचले.  त्यानंतर अजगराला पकडण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली.  काही तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांना अजगराला पकडण्यात यश आलं. या अजगराला प्राण्यांच्या दवाखान्यात नेण्यात आलं आहे. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करून त्याला जंगलात सोडण्यात आलं आहे. 

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया 

व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया देखील वर्तवल्या आहेत. अजगर खाली पडताच घरच्यांना अ‍ॅनाकोंडा चित्रपटाची आठवण झाली असेल असे एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.  तर एकाने एवढ्या मोठ्या आकाराचा अजगर असू शकतो ? यावर शंका उपस्थित केली आहे. मात्र, व्हिडिओ पाहून देखील अनेकांना घाम फुटेल असे एकाने म्हटलं आहे.  

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर