Viral News : न्यू मेक्सिकोतील एका ७० वर्षीय व्यक्तीला रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा सामना करावा लागला. झालं असं की, थकवा दूर करण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी हा वृद्ध हॉस्पिटलमध्ये गेला होता. मात्र, डॉक्टरांनी त्याच्यावर शीघ्रपतनासाठी उपचार केले.
रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली. त्याने नुकसान भरपाईचा दावा रुग्णालया विरोधात ठोकला. न्यायालयाने देखील पीडित व्यक्तीची बाजू ऐकून ३५०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा दंड रुग्णालयाल ठोठावला आहे. ही भरपाई रुग्णालयाला द्यावी लागणार आहे.
मेट्रो.को.यूके दिलेल्या माहितीनुसार, थकवा आणि वजन कमी करण्यासाठी उपचार घेण्याच्या आशेने ७० वर्षीय पीडित व्यक्ती हा २०१७ मध्ये न्यूमेल मेडिकल सेंटरमध्ये गेला होता. डॉक्टरांनी वजन कमी करण्याऐवजी त्यांच्यावर इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी चुकीचे उपचार केले. या वृद्धाला काही आठवडे अनेक इंजेक्शनदिले जात होते. ही बाब लक्षात आल्यावर त्याने २०२० मध्ये वकिलाच्या मदतीने रुग्णालयाविरोधात खटला दाखल केला होता. उपचारादरम्यान टेस्टोस्टेरॉन लावण्यात आल्याचा आरोप पीडित वृद्धाने केला आहे. यामुळे त्याचे गंभीर शारीरिक नुकसान झाले असल्याचे त्याने म्हटलं आहे.
या खटल्यात न्यायाधीशांना न्यूमेल मेडिकल सेंटरने निष्काळजी आणि फसवलं असल्याचं आढळलहं. रिपोर्टनुसार, क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाला उपचार घेण्याचे आमिष दाखवले. ऐवढेच नाही तर तसे न केल्यास त्यांना खूप त्रास होऊ शकतो अशी भीती देखील दाखवली. फिर्यादीचे वकील लोरी बेंको म्हणाले की, रुग्णालयत डॉक्टरांवर विश्वास ठेऊन रुग्ण उपचार घेत असतो. मात्र, रुग्णालयाने केलेला विश्वासघात गंभीर आहे.
ज्युरीने रुग्णालयाला ४१२ दशलक्ष डॉलर (३५०० कोटी रुपये) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. दंडात्मक नुकसानीअंतर्गत रुग्णालयाला त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल ३७५ दशलक्ष डॉलर (३१७७ कोटी रुपये) नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तथापि, शारीरिक आणि मानसिक नुकसानीसाठी सुमारे ३७ दशलक्ष डॉलर्स (३१३ कोटी रुपये) नुकसान भरपाई फिर्यादीला द्यावी लागणार आहे.
संबंधित बातम्या