Viral Video : न्यूयॉर्कमधील सिराक्यूज हॅनकॉक आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आकाशात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दोन विमाची धडक होता होता टळली. ही घटना ८ जुलै रोजी नॉर्थ सिराक्यूज पोलिस विभागाच्या पेट्रोलिंग कारवर बसवलेल्या कॅमेऱ्याने टिपली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीएनएन ने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही विमाने व्यावसायिक विमान कंपन्यांची होती. एक फ्लाइट पीएसए एयरलाइन ५५११ आणि दुसरी अँडेव्हेअर एयर ५४२१ होती. एफएएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ही घटना ८ जुलै रोजी सकाळी ११.५० वाजता घडली. एटीसी ने पीएसए एयरलाइन ५५११ ला Syracuse Hancock आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानापासून वेगळे होण्याचे निर्देश दिले होते. या धावपट्टीवरून हे विमान टेक ऑफ होत होते.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार २४ च्या डेटाच्या आधारे इंडियन एक्सप्रेसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, वॉशिंग्टनहून येणारे पीएसए फ्लाइट आणि न्यूयॉर्कला जाणारे एंडेव्हर एअर फ्लाइट एकमेकांपासून सुमारे ७०० ते १००० फुट अंतरावर होते. पीएसए एअरलाइन्स ५५११ मध्ये ७५ प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते. तर त्याच वेळी, एंडेव्हर एअर ५४२१ विमानात ७६ प्रवासी व चार क्रू सदस्य होते. यामध्ये दोन पायलट आणि दोन फ्लाइट अटेंडंटचा समावेश होता. सुदैवाने हा अपघात टळला.
मात्र, दोन्ही विमानांमध्ये धडक होण्याची शक्यता नसल्याची तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी म्हटले की एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑडिओने याबाबत दिलेल्या माहितीनुसार ट्रॅफिक कंट्रोलने सुरुवातीला पीएसए ५५११ ला उतरण्यासाठी मार्ग क्लीअर केला आणि त्याच रनवे २८ वरून एंडेव्हर एअर ५४२१ ला टेकऑफ करण्याची परवानगी दिली. त्यामुळे ही परिस्थिती तयार झाली.
संबंधित बातम्या